पॅराएशियनमध्ये सुयशची जलतरणभरारी...

suyash jadhav
suyash jadhav

भारतीय दिव्यांग जलतरणपटूंमध्ये (पॅरा स्विमर) सुयश जाधव हे नाव नवीन नाही. सुयशला दोन्ही हाताच्या कोपरापासून पुढे हातच नाहीत. असा हा जिद्दी सुयश जलतरणात जागतिक पातळीवर विक्रमी कामगिरी करत यश खेचून आणतो, ही भारतीयांसाठी मोठी अभिमानाची आणि स्फूर्तिदायक बाब आहे. त्याने 2018च्या पॅराएशियन जलतरण स्पर्धेत एक सुवर्ण व दोन ब्रॉंझ पदकांची कमाई केली आहे. सुयश 2016च्या पॅरालिंपिकमध्ये पात्रता फेरीत "अ' श्रेणी मिळविणारा पहिलाच भारतीय पॅरालिंपिक खेळाडू. सुयशचे हे यश गर्वास्पदच.

सुयशच्या वाटचालीत कोणते अडथळे आले?
सुयशचा सराव जोमात सुरू होता. पॅराएशियन जलतरण स्पर्धेला केवळ दोनच महिने राहिले होते. एकेदिवशी अचानक तयारी करत असताना त्याला उजव्या गुडघ्यामध्ये वेदना जाणवू लागल्या. या वेदना केवळ पोहतानाच होत होत्या, असे नव्हे, तर पाण्याबाहेर असतानाही सतत होत होत्या.

या वेदना कशामुळे होत होत्या?
सुयशला तपासल्यानंतर आमच्या असे लक्षात आले की, त्याला होणाऱ्या वेदनेचे मूळ जलतरण स्पर्धेच्या बाहेर होणाऱ्या त्याच्या हालचालींमध्ये आहे. सुयशच्या वैद्यकीय तपासणीमध्ये त्याच्या गुडघ्यामध्ये काही आजार अथवा दोष दिसत नव्हता. त्यामुळे, त्याच्या रेडिओलॉनिकल तपासणीबद्दल आम्ही आग्रही होतो. काही हालचालींमध्ये लोडिंग पॅटर्नचा प्रभाव जाणवत होता.

सुयशवरील उपचारांची दिशा कशी ठरवली?
त्याच्या प्रशिक्षकांबरोबर चर्चा केल्यानंतर आम्ही त्याच्या जलतरणाच्या नियोजनात बदल केला. एकावेळी त्याचे उपचार व जलतरणाचे हे बदललेले नियोजन सुरू ठेवले. आम्ही टेपिंग, एमएफआर तंत्राचा आधार घेऊन पुनर्वसनाचा आराखडा तयार केला. त्याच्या सर्व सत्रांचे व्यवस्थित नियोजन केले. प्रशिक्षकाने सांगितल्याप्रमाणे जलतरण प्रशिक्षणात बदल केला. पुन्हा जोरात तयारी सुरू ठेवली. या काळात वेळोवेळी सुयशची जलतरणातील प्रगती आणि वेदनांच्या प्रमाणाचा आढावा घेणे सुरू होते.

या मेहनतीला कसे यश आले?
सुयशला या महत्त्वाच्या स्पर्धेत केवळ भाग घ्यायचा नव्हता; तर ती स्पर्धा जिंकायची होती. देशासाठी पदकही मिळवायचे होते. त्यामुळे त्याने वेदनेपासून मुक्ती मिळाल्याबरोबर स्पर्धेमध्ये कमीत कमी वेळेत अंतर पूर्ण करण्याकडे लक्ष केंद्रित केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com