

Kabaddi News: राष्ट्रीय मिल मजदूर संघ आयोजित कामगार महर्षी गं.द. आंबेकर स्मृती कबड्डी महोत्सवाच्या महिला गटात अत्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम लढतीत बलाढ्य शिवशक्तीने डॉ. शिरोडकर स्पोर्ट्स क्लबचा 35-30 असा पराभव करीत जेतेपद पटकावले.
पुरुषांच्या स्थानिक गटात विजय क्लबने जय भारत क्रीडा संघाचा पराभव करत बाजी मारली तर व्यावसायिक गटात स्वामी समर्थने रिझर्व बँक स्पोर्ट्स क्लबचा 34 -32 असा अवघ्या दोन गुणांनी पराभव करीत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.