Kangana Ranaut : ‘कंगना राणावतवर मेंटल हॉस्पिटलमध्ये उपचार करा’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kangana ranaut

‘कंगना राणावतवर मेंटल हॉस्पिटलमध्ये उपचार करा’

sakal_logo
By
केवल जीवनतारे

नागपूर : भारताला १९४७ साली स्वातंत्र्य हे भिकेत मिळाले. खरे स्वातंत्र्य २०१४ साली मिळाले, असे बेताल वक्तव्य करणारी अभिनेत्री कंगना राणावत हिच्यावर मनोरुग्णालयात उपचार करण्यात यावे, अशी मागणी सामाजिक संघटनांनी केली आहे. यासंदर्भातील निवेदन मनोरुग्णालय अधिक्षकांना देण्यात आले आहे.

वादग्रस्त विधाने करणाऱ्या कंगनाविरोधात विविध राजकीय पक्षांपासून तर स्वातंत्र्य संग्रामसैनिकांपर्यंत विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. मात्र, उपराजधानीत कंगनाविरोधात चक्क प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल करून तिच्यावर उपचार करण्यात यावा, अशी मागणी करणारे निवेदन सादर करण्यात आले आहे.

हेही वाचा: रश्मी देसाईचा ट्यूब ब्रामध्ये बोल्ड फोटोशूट

रस्त्यावर बरळणाऱ्या मनोरुग्णाला जसे पोलिस मनोरुग्णालयात दाखल करतात त्याचप्रमाणे कंगनाला पोलिसांमार्फत नागपुरातील प्रादेशिक मनोरुग्णालयात रुग्णालयात दाखल करावे, तिला शॉक ट्रीटमेंट द्यावी, अशी मागणी निवेदनात केली आहे. निवेदन देण्यासाठी शिष्टमंडळ येणार म्हणून रुग्णालयात मोठी गर्दी जमली होती. विविध सामाजिक संघटनांचे पन्नासपेक्षा जास्त कार्यकर्ते उपस्थित होते. सलीम खान यांनी मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पुरुषोत्तम मडावी यांना या मागणीचे निवेदन दिले.

दुपारच्या वेळी अशाप्रकारचे निवेदन देण्यासाठी शिष्टमंडळ येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार एका पक्षाच्या अल्पसंख्याक विभागातर्फे निवेदन देण्यात आले आहे. निवेदन स्वीकारले.
- डॉ. पुरुषोत्तम मडावी, वैद्यकीय अधीक्षक, प्रादेशिक मनोरुग्णालय, नागपूर
loading image
go to top