
VIDEO : सामना जिंकण्यासाठी दोन 'रिटायर्ड आऊट' तरी..
नवी दिल्ली : क्रिकेटच्या मैदानात घडलेला एक अजब प्रकार सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. संघाने सामना जिंकण्यासाठी एका विशेष नियमाच्या आधारे रणनिती आखली. मात्र त्यांच्या या रणनितीमुळे ते स्वतःच तोंडावर आपटले. टी 20 ब्लास्ट या लीगमधल्या नॉटिंघमशायर आणि वॉर्विकशायर या दोन संघात सामन्यात हा अजब प्रकार घडला. (T20 Blast 2022 Two Batsmen Retire Out Video Gone Viral)
हेही वाचा: 'आयपीएल स्टार' डेव्हिड मिलरचे होणार प्रमोशन, खुद्द कर्णधाराने दिले संकेत
नॉटिंघमशायर आणि वॉर्विकशायर यांच्यातील सामना पावसामुळे प्रत्येकी 8 षटकांचा खेळवण्यात आला. वॉर्विकशायरकडून खेळणाऱ्या कार्लोस ब्रेथवेटने (Carlos Brathwaite) 11 चेंडूत 17 धावा केल्या होत्या. सामन्याचे शेवटचे षटक सुरू होते. तेवढ्यात अचानक ब्रेथवेट रिटायर्ड आऊट होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याची जागा सॅम हॅनने घेतील. मात्र यानंतर त्याला एकही चेंडू खेळण्याची संधी मिळाली नाही. दुसऱ्या बाजूने एलेक्स डेविसने 4 चेंडूत 14 धावा चोपून 8 षटकात 5 बाद 98 धावांपर्यंत मजल मारली.
हेही वाचा: 'आयपीएल स्टार' डेव्हिड मिलरचे होणार प्रमोशन, खुद्द कर्णधाराने दिले संकेत
दरम्यान, हे आव्हान पार करताना नॉटिंघमशायरने देखील शेवटच्या षटकापर्यंत झुंज दिली. मात्र ज्यावेळी संघाला एका चेंडूत विजयासाठी तीन धावांची गरज होती त्यावेळी संघ व्यवस्थापनाने समित पटेलला (Samit Patel) रिटायर्ड आऊट करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय त्यांच्या चांगलाच अंगलट आला. चेंडू नो बॉल असल्याने स्ट्राईक टॉम मूरेसकडे गेले. मात्र त्याला शेवटच्या चेंडूवर फक्त 1 धाव करता आली. वॉर्विकशायरने सामना 1 धावेने जिंकला. सध्या या अजब प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
हेही वाचा: उमरान मलिकने ब्रेट लीला दिले सडेतोड उत्तर, मी...
Web Title: T20 Blast Two Batsmen Retired Out Video Gone Viral
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..