उमरान मलिकने ब्रेट लीला दिले सडेतोड उत्तर, मी...

टीम इंडियाटा युवा खेळाडू उमरान मलिकची पाकिस्तानचा माजी गोलंदाज वकार यूनिससोबत केली तुलना
Umran Malik News, Fastest Ball in IPL 2022
Umran Malik News, Fastest Ball in IPL 2022Sakal

यंदाच्या आयपीएल १५ व्या सीझनमध्ये टीम इंडियाला अनेक नवखे खेळाडू मिळाले आहेत. यामध्ये अग्रेसर नाव असणारा खेळाडू म्हणजे युवा वेगवान गोलंदाज उमरान मलिक. सध्या क्रिकेट जगतात त्याची चर्चा ऐकायला मिळते. जगभरातील अनेक दिग्गज त्याची तुलना महान गोलंदाजांसोबत करत आहेत. दरम्यान, ऑस्ट्रेलियाचे दिग्गज ब्रेट लीने उमरानच्या वेगाची तुलना पाकिस्तानचा माजी गोलंदाज वकार यूनिससोबत केली. मात्र, उमरानला ते पटलं नाही. त्याने ब्रेटलीच्या वक्तव्यावर पलटवार केला.

Umran Malik News, Fastest Ball in IPL 2022
विश्वनाथन आनंदने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला पराभवाचा धक्का

मी वकार यूनिसला फॉलो करत नाही. मी स्वाभिमानी आहे. माझे आदर्श जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार हे आहेत. मी त्यांना फॉलो करतो. मी जेव्हा त्यांच्यासोबत असतो तेव्हा मला खुप काही शिकायला मिळतं. आणि मी त्यांच्याकडून शिकण्याचा प्रयत्न करतो.

सनरायझर्स हैदराबादकडून खेळणारा उमरानने १४ सामन्यात २२ विकेट घेतल्या. गुजरातविरुद्ध २५ धावा देत ५ विकेट घेतल्या. हे त्याचे हंगामातील सर्वश्रेष्ठ प्रदर्शन मानलं जातं. साऊथ अफ्रिकेविरुद्ध आगामी टी २० सीरीजसाठी उमरानची निवड करण्यात आली आहे.

अशा भावनांनी वाहून जाण्यात काही अर्थ नाही. तुझ्या नशिबात जे काही लिहिले आहे ते घडलेच पाहिजे. मला माझ्या देशासाठी माझे सर्वोत्तम द्यायचे आहे. मला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 5 टी-20 मालिकेसाठी संधी देण्यात आली. हे माझे ध्येय असेल. या सर्व सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करावी आणि एकट्याने टीम इंडियाला सामन्यांमध्ये विजय मिळवून द्यावा." असे स्वप्न पाहत असल्याचे मलिकने म्हटलं आहे.

Umran Malik News, Fastest Ball in IPL 2022
IND vs ENG: रोहित शर्माने इंग्लंड दौऱ्यासाठी केली तयारी सुरू

"भारतातून मला मिळालेल्या आदर आणि प्रेमाबद्दल सर्वप्रथम मी खूप आभारी आहे. नातेवाईक आणि इतर लोक सतत माझ्या घरी येत असतात, खूप छान वाटतं. आयपीएलनंतर मी थोडा व्यस्त झालो, पण मी प्रशिक्षण कधीही चुकवले नाही सरावामध्ये सातत्य ठेवले आहे. अशी भावना उमरानने टी २० साठी निवड केल्यानंतर व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com