T-20 Captaincy Record : धोनी-कोहली फर्स्ट क्लास; पण रोहित डिस्टिंगशनमध्ये

विराट कोहलीनं 'ऑल इज नॉट वेल' म्हणत टी20 वर्ल्ड कपनंतर टी-20 संघाचं नेतृत्व सोडणार असल्याचं स्पष्ट केलं.
T-20 Captaincy Record
T-20 Captaincy RecordTeam eSakal

टी20 वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारतीय क्रिकेटमध्ये 'विराट' बदल होणार आहे. नेतृत्व विभाजनाची (split captaincy) पाश्चिमात्य पद्धत टीम इंडियासाठी लागू होणार नाही, असा दावा गेल्या काही दिवसांपासून करण्यात येत होता. अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी याला विरोधही दर्शवला. पण खुद्द विराट कोहलीनं 'ऑल इज नॉट वेल' म्हणत टी20 वर्ल्ड कपनंतर टी-20 संघाचं नेतृत्व सोडणार असल्याचं स्पष्ट केलं. मुळात क्रिकेट खेळच लोकाचा...त्यामुळे split captaincy च्या मुद्यावर ही आपली संस्कृती नाही हा युक्तिवादच निर्थक होता. विराट निर्णयानंतर स्प्लिट कॅप्टन्सीचा मुद्दाच निकाली लागलाय.

स्प्लिट कॅप्टन्सी म्हणजे काय?

सध्याच्या घडीला क्रिकेटमधील कसोटी, वनडे आणि टी-20 अशा तीन वेगवेगळ्या प्रकारात अनेक टीम वेगवेगळ्या कॅप्टनच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरताना दिसते. टी -20 वर्ल्ड कपनंतर भारतीय संघातही तेच चित्र पाहायला मिळेल. विराट वन डे आणि कसोटी संघाचे नेतृत्व केरल . दुसरीकडे टी-20 संघाची जबाबदारी दुसऱ्याच्या खांद्यावर पडेल.

कोहलीनंतर टी-20 चा किंग कोण?

विराट कोहलीनंतर टीम इंडियाच्या टी- संघाची जबाबदारी कोणाच्या खांद्यावर पडणार यावर फार विचार करण्याची गरज नाही. कोहलीनं आपल्या निवेदनात त्या नावाचाही उल्लेख केलाय. रवी भाई आणि रोहित...यांच्याशी चर्चा करून या निर्णयापर्यंत पोहचल्याचे विराटने म्हटले आहे. टी-20 संघात रोहितच्या नेतृत्वाखाली खेळण्यास काही अडचण नाही, असेच विराटने लेती दिलंय.

T-20 Captaincy Record
IPL 2021: Orange Cap च्या शर्यतीत आघाडीवर असलेले 5 फलंदाज

कॅप्टन्सी रेकॉर्ड

विराट कोहली (2017-2021) सामने 45, विजय 27, पराभव 14, बरोबरी 2, अनिर्णित 2, विजयाची टक्केवारी 65.11℅

धोनी- (2007-2016) सामने 72, विजय 41, पराभव 28, बरोबरी 1, अनिर्णित 2, विजयाची टक्केवारी 59.28℅

रोहित शर्मा (2017-2020) सामने 19, विजय 15, पराभव 4, बरोबरी 0, अनिर्णित0, विजयाची टक्केवारी 78.94 ℅

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com