T20 World Cup : माझा हा शेवटचा सामना ठरला असता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मॅथ्यू वेड

T20 World Cup : माझा हा शेवटचा सामना ठरला असता

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

दुबई : ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेतील ऑस्ट्रेलियाच्या उपांत्य फेरीतील विजयाचा यष्टिरक्षक फलंदाज मॅथ्यू वेड शिल्पकार ठरला. वेडने या सामन्यात केवळ १७ चेंडूंमध्ये ४१ धावांची धुवाधार खेळी केली व शेवटी सलग तीन षटकार ठोकत ऑस्ट्रेलियाला दिमाखदारपणे अंतिम फेरीत पोचवले; परंतु या सामन्यापूर्वी आपली ऑस्ट्रेलियन जर्सीमध्ये खेळण्याची ही शेवटची संधी असेल, असे वेडला वाटले होते. याबद्दलचे स्पष्टीकरण स्वतः वेडने सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेमध्ये दिले आहे.

हेही वाचा: T20 World Cup : २०२१ मध्ये मिळणार नवा चॅम्पियन

‘‘मी सामन्यापूर्वी थोडा घाबरलो होतो आणि मला माहीत होते, की ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व करण्याची ही माझी शेवटची संधी आहे. मला फक्त चांगली कामगिरी करायची होती आणि खरोखरच हा सामना जिंकायचा होता, जेणेकरून आम्हाला स्पर्धा जिंकण्याची संधी मिळेल. या स्पर्धेची अंतिम फेरी माझा शेवटचा सामनाही असू शकते. मी यापूर्वी म्हटल्याप्रमाणे, माझी त्यासाठीची तयारी आहे. फक्त जेव्हा मी निरोप घेतल्यानंतर माझ्या शेवटच्या खेळाकडे मागे वळून बघेन, तेव्हा नक्कीच मला स्वतःचा अभिमान वाटेल,’’ असे वेडने या वेळी म्हटले आहे.

loading image
go to top