T20 World Cup New Winner : २०२१ मध्ये मिळणार नवा चॅम्पियन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

New Zealand and
Australia

T20 World Cup : २०२१ मध्ये मिळणार नवा चॅम्पियन

नागपूर : गुरुवारी खेळल्या गेलेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा पराभव करून अंतिम सामन्यात धडक दिली. या विजयाने ऑस्ट्रलियाने ११ वर्षांपूर्वी केलेली कामगिरीची पुनरावृत्ती केली. अकरा वर्षांपूर्वी पाकिस्तानलाच पराभूत करून ऑस्ट्रेलियाने अंतिम सामन्यात धडक दिली होती. यंदा अंतिम सामना खेळणारे दोन्ही संघांपैकी कोणताही विजयी झाल्यास तो पहिल्यांदाच विश्वचषक जिंकेल.

२००७ मघ्ये आयसीसीकडून पहिल्यांदाच टी-२० विश्वचषक खेळला गेला. पहिल्याच विश्वचषकावर भारताने आपले नाव कोरले. आतापर्यंत सहा विश्वचषक पार पडले असून, वेस्ट इंडीज व्यतिरिक्त अन्य कोणत्याही संघाला दोनदा विश्वचषक जिंकता आला नाही. आजवर श्रीलंकेने तीनदा अंतिम सामन्यात धडक दिली. मात्र, त्यांना एकदाच विश्वचषक जिंकता आला.

हेही वाचा: अमरावती : बंदसाठी दगडफेक; त्रिपुरा घटनेचा निषेध

मोक्याच्या सामन्यात नेहमी पराभूत होणारा न्यूझीलंडचा संघ यंदा प्रथमच टी-२० विश्वचषकाचा सामना खेळणार आहे. २०१९ मध्ये पार पडलेल्या एकदिवसीय विश्वचषकातही न्यूझीलंडचा संघ अंतिम सामन्यात पोहोचला होता. मात्र, रोमहर्षक सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. यंदाही त्याची पुनरावृत्ती होणार तर नाही ना, असा प्रश्न न्यूझीलंडच्या चाहत्यांमध्ये असेल.

दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्यांना अंतिम सामना खेळणार आहे. २०१० मध्ये झालेल्या विश्वचषकात त्यांना कट्टर प्रतिस्पर्धी इंग्लंडकडून पराभूत व्हावे लागले होते. यंदा त्यांचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. २०२१ च्या टी-२० विश्वचषकाचा ताज कोण घालणार हे येत्या रविवारी समजणार आहे.

हेही वाचा: बाहेरून फिरून येतो अस म्हणत घराबाहेर पडला अन् झाला खून

आतापर्यंतचे विजेते संघ

वर्ष विजेता संघ उपविजेता संघ

२००७ भारत पाकिस्तान

२००९ पाकिस्तान श्रीलंका

२०१० इंग्लंड ऑस्ट्रेलिया

२०१२ वेस्ट इंडीज श्रीलंका

२०१४ श्रीलंका भारत

२०१६ वेस्ट इंडीज इंग्लंड

loading image
go to top