esakal | T20 World Cup 2021 | वैद्यकीय समितीला सर्वाधिकार
sakal

बोलून बातमी शोधा

सीईओ जॉफ अलार्डायस

T20 World Cup 2021 | वैद्यकीय समितीला सर्वाधिकार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

दुबई : येत्या ट्वेन्टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत संघातील संबंधित व्यक्ती कोरोना बाधित झाली तर त्या संघाच्या आणि सामन्याच्या भवितव्याचा निर्णय आयसीसीची समिती घेईल, द्विपक्षीय मालिकांप्रमाणे त्या त्या देशांकडे निर्णय घेण्याचे अधिकार नसतील, असे स्पष्ट मत आयसीसीचे हंगमी सीईओ जॉफ अलार्डायस यांनी व्यक्त केले.

आयसीसीने सर्व नियम काटेकोरपणे तयार केले आहेत. त्यासाठी वैद्यकीय तज्ज्ञांची समितीही स्थापन केली आहे. त्यात बीसीसीआयच्या डॉ. अभिजित साळवी यांचाही समावेश आहे. स्पर्धेसाठी जैवसुरक्षा वातावरण तयार करण्यात आले असले, काही जण कोरोनाबाधित होऊ शकतात, अशी शक्यता आयसीसीने गृहीत धरली आहे. आम्ही यासंदर्भात सर्व संघांना सूचना दिल्या आहेत. समितीही स्थापन केली आहे आणि कोणी तरी संबंधित बाधित होण्याचा प्रसंग आला तर पुढे काय करायचे याचाही विचार आम्ही सुरू केला आहे, असे अलार्डायस म्हणाले.

नाव ड्रिंक ब्रेक, फायदा ब्रॉडकास्टर्सचा

या ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत आयपीएलप्रमाणे प्रत्येक डावात अडीच मिनिटांचे दोन ब्रेक असणार आहेत. आयपीएलमध्ये या ब्रेकना स्ट्रॅटेजिक ब्रेक (रणनीती) म्हटले जाते; पण वर्ल्डकपमध्ये ड्रिंक (शीतपेय) म्हटले जाणार आहेत. संपूर्ण सामन्यात मिळून १० मिनिटांचा हा वेळ ब्रॉडकास्टरना जाहिरात दाखवण्यासाठी होणार आहे.

खेळपट्ट्यांबाबत चिंता नाही

अमिरातीतील खेळपट्ट्यांबाबत फारशी चिंता करण्याचे कारण नाही. तिन्ही ठिकाणांची (दुबई, शारजा आणि अबुधाबी) परिस्थिती वेगवेगळी आहे. स्पर्धेतील संघ या परिस्थितींशी कसे जुळवून घेतात हे महत्त्वाचे ठरणार आहे, असे अलार्डायस यांनी सांगितले. शारजातील संथ झालेल्या खेळपट्टीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. सध्या सुरू असलेल्या आयपीएलमधील शारजात होणारे सामने कमी धावसंख्येचे होत आहेत. याचा परिणाम विश्वकरंडक स्पर्धेवरही होईल असे बोलले जात आहे.

loading image
go to top