हार्दिक पांड्यासंदर्भात रोहित शर्मानं केलं मोठ वक्तव्य

आयपीएलमधील साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यानंतर रोहित शर्माने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
हार्दिक पांड्यासंदर्भात रोहित शर्मानं केलं मोठ वक्तव्य

T20 World Cup 2021: मुंबई इंडियन्सचा कर्णधार आणि भारतीय संघाचा उप-कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) आगामी टी-20 वर्ल्ड कपसंदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे. हार्दिक पांड्यानं (Hardik Pandya) आयपीएलमध्ये गोलंदाजी केली नसली तरी तो वर्ल्ड कप स्पर्धेत गोलंदाजी करताना दिसेल, असा विश्वास रोहित शर्मानं व्यक्त केलाय.

आयपीएलमधील साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यानंतर रोहित शर्माने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी रोहितला हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. यावर रोहितनं तो लवकरच गोलंदाजीला सुरुवात करेल, असे उत्तर दिले. फिजिओ आणि ट्रेनर हार्दिक पांड्याने गोलंदाजीत कमबॅक करावे, यादृष्टीने काम करत आहेत. आतापर्यंत त्याने एकही चेंडू टाकलेला नाही. त्याच्या फिटनेस पाहून आम्ही त्याचा योग्य वेळी वापर करु, असे रोहित यावेळी म्हणाला.

हार्दिक पांड्यासंदर्भात रोहित शर्मानं केलं मोठ वक्तव्य
IPL Record : MI विरुद्ध नबीनं रचला खास विक्रम

हार्दिक पांड्याच्या फिटनेस स्तर दिवसेंदिवस उंचावत आहे. त्यामुळे पुढच्या आठवड्यापासूनच तो गोलंदाजी करण्यास सुरुवात करताना दिसू शकेल. यासंदर्भातील अंतिम निर्णय हा फिजिओच घेतील, असेही रोहित यावेळी म्हणाला. हार्दिक पांड्याने आयपीएलमध्ये नावाला साजेशी फलंदाजी केलेली नाही. त्याने केवळ 127 धावा केल्या आहेत. त्यामुळेच टी-20 वर्ल्डकपसाठीच्या त्याच्या निवडीवरही प्रश्नचिन्ह उपस्थितीत करण्यात येत आहेत. गोलंदाजी न करता फलंदाजीतही संघर्ष करत असलेल्या हार्दिक पांड्याची रोहितने पाठराखणही केलीये. सध्याच्या घडीला तो थोडा निराश दिसतोय. पण तो एक उत्तम खेळाडू आहे. यापूर्वी त्याने बॅड पॅचमधून सावरुन दाखवलं आहे. पुन्हा एकदा तो आपल्यातील तीच क्षमता दाखवून देईल, असा विश्वास रोहित शर्माने व्यक्त केलाय.

हार्दिक पांड्यासंदर्भात रोहित शर्मानं केलं मोठ वक्तव्य
कानामागून आली अन् तिखट झाली...

आयपीएल स्पर्धा ही टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेची रंगीत तालीम आहे, असे मानले जात आहे. पण रोहितनं मात्र दोन्ही स्पर्धा पूर्णत: वेगळ्या असल्याचे म्हटले आहे. फ्रेंचायझी क्रिकेट आणि वर्ल्ड कप खेळाचा प्रकार एकच असला तरी या दोन स्पर्धेकडे एकाच नजरेतून बघता येत नाही, असेही रोहितने म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com