IPL Record : MI विरुद्ध नबीनं रचला खास विक्रम

हैदराबाद संघाला स्पर्धेची सांगता विजयाने करता आली नसली तरी या संघातील खेळाडूंन खास विक्रमाला गवसणी घातली.
mohammad nabi
mohammad nabi

मुंबई इंडियन्स (MI) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यातील सामन्यानंतर प्ले ऑफचे चित्र स्पष्ट झाले. हैदराबाद विरुद्धच्या सामना जिंकूनही मुंबई इंडियन्स स्पर्धेतून बाहेर पडले. दुसरीकडे स्पर्धेतून पहिल्यांदा आउट झालेल्या हैदराबाद संघाला स्पर्धेची सांगता विजयाने करता आली नसली तरी या संघातील खेळाडूंन खास विक्रमाला गवसणी घातली. आतापर्यंतच्या 13 हंगामात जी गोष्ट झाली नाही ती या सामन्यात पाहायला मिळाली.

सनरायझर्स हैदराबादचा अष्टपैलू मोहम्मद नबीने मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात पाच झेल टिपले. एका डावात एखाद्या क्षेत्ररक्षकाने घेतलेले हे सर्वाधिक कॅचेस आहेत. मोहम्मद नबी मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) सह सुर्यकुमार यादव (Suryakumar Yadav), जेम्स नीशम (James Neesham), क्रुणाल पांड्या (Krunal Pandya) आणि नॅथन कुल्टर नील (Nathan Coulter-Nile) यांचे झेल टिपले.

mohammad nabi
कानामागून आली अन् तिखट झाली...

यापूर्वी विकेटमागे कुमार संगकाराने (Kumar Sangakkara) 2011 च्या हंगामात डेक्कन चार्जर्सकडून खेळताना विकेटमागे पाच झेल टिपले होते. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध त्याने ही कामगिरी नोंदवली होती. मुंबई इंडियन्सने अखेरच्या साखळी सामन्यात निर्धारित 20 षटकात 235 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबादचा संघ 193 धावांपर्यंत मजल मारु शकला. मुंबईला प्ले ऑफसाठी पात्र ठरण्यासाठी हैदराबादला 65 धावांत रोखायचे होते. पण मुंबईला हे जमलं नाही. परिणामी त्यांचा स्पर्धेतील प्रवास संपुष्टात आला.

mohammad nabi
T20 World Cup: ऐनवेळी पाकिस्तानच्या संघात तीन बदल

मुंबई आणि कोलकाता नाइट रायडर्स यांनी प्रत्येकी 14-14 गुणांची कमाई केली. खराब नेट रनरेटमुळे मुंबईला स्पर्धेबाहेर पडावे लागले. तर कोलकाताने प्ले ऑफची जागा पक्की केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com