esakal | T20 World Cup : 'चॅम्पियन' संघात स्फोटक फलंदाजांचा भरणा
sakal

बोलून बातमी शोधा

west indies

T20 World Cup : 'चॅम्पियन' संघात स्फोटक फलंदाजांचा भरणा

sakal_logo
By
सुशांत जाधव

टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत दोन वेळा जेतेपद पटकवणारा आणि यंदाच्या स्पर्धेतील प्रबळ दावेदार मानला जाणाऱ्या वेस्ट इंडिज संघाने वर्ल्ड कपसाठी तगडा संघ निवडला आहे. कायरॉन पोलार्डच्या नेतृत्वाखालील वेस्ट इंडिज संघात (West Indies T20 World Cup Squad) 6 वर्षानंतर 36 वर्षीय रवी रामपॉलचे कमबॅक केले आहे. 2015 च्या वर्ल्ड कप स्पर्धेत तो वेस्ट इंडिजकडून खेळला होता. त्यानंतर त्याला संघात स्थान मिळाले नाही. सध्या तो दमदार कामगिरी करत असून वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाच्या निवड समितीने त्याच्यावर विश्वास टाकला आहे.

याशिवाय वेस्ट इंडिजच्या संघात स्फोटक फलंदाज क्रिस गेल, ड्वेन ब्रावो यांनाही स्थान देण्यात आले आहे. जेसन होल्डर, शेल्डन कॉट्रेल आणि अकील होसैन यांचा राखीव खेळाडूंच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. वेस्ट इंडिजच्या संघात एकापेक्षा खेळाडू हे मोठ्या फटकेबाजीत माहिर असणारे आहेत. यात ख्रिस गेल, कॅरॉ पोलार्ड, शेमरॉन हेटमायर, एविन लुईस यांचा समावेश असून अष्टपैलूमध्ये आंद्रे रसेल, ड्वेन ब्रावो, फॅबियन एलेनही मोठी नाव आहेत.

टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी वेस्ट इंडिजचा संघ

केरॉन पोलार्ड(कर्णधार), निकोलस पूरन, ख्रिस गेल, फॅबियन एलेन, ड्वेन ब्रावो, रॉस्टन चेज, आंद्रे फ्लेचर, शिमरॉन हेटमायर, एविन लुईस, रवी रामपॉल, आंद्रे रसेल, लेंडल सिमंस, अल्फांसो थॉमस आणि हेडन वॉल्श.

राखीव खेळाडू- डॅरेन ब्रावो, शेल्डन कॉट्रेल, जेसन होल्डर आणि अकील होसैन.

रवी रामपॉलला संधी देण्यामागेच कारण...

रवी रामपॉल कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये धमाकेदार कामगिरी करुन दाखवली आहे. उजव्या हाताने गोलंदाजी करणाऱ्या रामपॉलने यंदाच्या कॅरेबियन लीग स्पर्धेत 8 सामन्यात 17 विकेट घेतल्या आहेत. त्याला 161 टी 20 सामन्याचा अनुभव आहे. ज्यात त्याने एकूण 209 विकेट घेतल्या आहेत. त्यामुळेच त्याला चॅम्पियन संघात स्थान मिळाले आहे.

यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत वेस्ट इंडिजचा संघ प्रबळ दावेदार

वेस्ट इंडिज संघ यंदाच्या स्पर्धेतही प्रबळ दावेदार मानला जात आहे. गतवर्षी त्यांनीच जेतेपद मिळवले होते. 2016 मध्ये त्यांनी इंग्लंडला पराभूत करत वर्ल्ड कप उंचावला होता. यापूर्वी 2012 मध्येही त्यांनी पहिला वर्ल्ड कप जिंकला होता.

loading image
go to top