Ind Vs Pak: पराभवानंतर पाकच्या माजी खेळाडूनं दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा; म्हणाला, "जय श्री राम..."

t20 world cup 2022 danish kaneria wishes everyone on diwali says he wants to visit ayodhya
t20 world cup 2022 danish kaneria wishes everyone on diwali says he wants to visit ayodhya ESAKAL

टि-२० विश्वचषक सामन्यात पाकिस्तानला भारताकडून पराभवाचे तोंड पाहावे लागले, दरम्यान या परभावानंतर पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूने सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. एवढेच नाही तर या क्रिकेटपटूने अयोध्येला जाण्याची इच्छाही व्यक्त केली आहे. हा क्रिकेटर दुसरा कोणी नसून दानिश कनेरिया आहे. पाकिस्तानचा माजी फिरकी गोलंदाज दानिश कनेरिया याने सोमवारी जगभरातील हिंदूंना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आणि लवकरच भारतातील अयोध्या मंदिराला भेट देणार असल्याचा दावा केला.

दानिश कनेरिया यांनी ट्विट केले की, "जय श्री राम. संपूर्ण जगाला दिवाळीच्या शुभेच्छा. राम मंदिराचे दर्शन घेण्याचे माझे ध्येय आहे, राम भगवान, मी येईन." दरम्यान कनेरियाच्या या ट्विटला लोक मोठ्या प्रमाणात लाईक करत आहेत, तसेच अनेकांनी ट्विट करत दिवाळीच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

t20 world cup 2022 danish kaneria wishes everyone on diwali says he wants to visit ayodhya
Diwali Festival: 'दिवाळी पहाट'साठी मुख्यमंत्री पोहचले ठाण्यात! येथे पाहा PHOTOS

दानिश कनेरिया, ज्यांचे पूर्ण नाव दानिश परभ शंकर कनेरिया आहे, ते अनिल दलपत नंतरचे दुसरे हिंदू आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करणारा सातवे गैर-मुस्लिम खेळाडू आहे. कनेरियाने पाकिस्तानसाठी 61 कसोटी सामने खेळले आणि 34.79 च्या सरासरीने 261 बळी घेतले. त्याने 18 एकदिवसीय सामनेही खेळले, ज्यामध्ये त्याला केवळ 15 विकेट घेता आल्या.

t20 world cup 2022 danish kaneria wishes everyone on diwali says he wants to visit ayodhya
Recharge Plan: 400 रुपयात नेटप्लिक्स, प्राइम व्हिडिओसह मिळेल फ्री 50GBडेटा अन् कॉलिंग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com