T20 World Cup 2022 : रोहितने 'विराट सेने'तील सहा जणांना दिला नारळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rohit Dropped 6 Players From Previous T20 World Cup Team Lead By Virat Kohli

T20 World Cup 2022 : रोहितने 'विराट सेने'तील सहा जणांना दिला नारळ

T20 World Cup 2022 India Squad : 16 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियात सुरू होणाऱ्या टी 20 वर्ल्डकपसाठी बीसीसीआयने नुकताच भारतीय संघ घोषित केला. वर्ल्डकप खेळणाऱ्या अनेक संघांनी यापूर्वीच संघाची घोषणा केली होती. मात्र भारताने आशिया कपनंतरच आपल्या संघाची घोषणा केली. विशेष म्हणजे कोरोनामुळे पुढे ढकलावा लागल्याने सलग दुसऱ्या वर्षी टी 20 वर्ल्डकप आयोजित केला जाणार आहे. गेल्याच वर्षी 2021 मध्ये संयुक्त अरब अमिरातीमध्ये टी 20 वर्ल्डकपचे आयोजन केले होते. त्यावेळी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली होता. मात्र टी 20 वर्ल्डकपपूर्वीच त्याने टी 20 संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याची घोषणा केली होती. (Rohit Dropped 6 Players From Previous T20 World Cup Team Lead By Virat Kohli)

हेही वाचा: Asia Cup : कोण आहे 'ती' मिस्ट्री गर्ल? तिच्यासाठी भारतीय प्रेक्षकांनी संपूर्ण सामना पाहिला

आता भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्माच्या खांद्यावर आले आहे. त्यामुळे 2021 वर्ल्डकपमध्ये खेळलेल्या भारताच्या टी 20 संघात मोठे बदल झाले आहेत. गेल्या वर्ल्डकपमधील जवळपास सहा खेळाडू हे यंदाच्या ऑस्ट्रेलियात होणाऱ्या वर्ल्डकप संघात दिसणार नाहीत. भारताने 2021 च्या वर्ल्डकप संघात पाच बदल केले आहेत. तर एक बदल हा दुखापतीमुळे नाईलाजास्तव करावा लागला आहे.

गेल्या टी 20 वर्ल्डकप संघातील इशान किशन, मोहम्मद शामी, राहुल चाहर, शार्दुल ठाकूर, वरूण चक्रवर्ती, रविंद्र जडेजा हे यंदाच्या टी 20 वर्ल्डकप संघात नाहीयेत. यातील रविंद्र जडेजाचा अपवाद वगळता इतरांना नाराळ देण्यात आला आहे. रविंद्र जडेजा दुखापतीमुळे टी 20 वर्ल्डकपला मुकला आहे.

या खेळाडूंच्या बदली दीपक हुड्डा, दिनेश कार्तिक, युझवेंद्र चहल, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग आणि अक्षर पटेलचा संघात समावेश करण्यात आला आहे. अक्षर पटेल हा रविंद्र जडेजाची रिप्लेसमेंट म्हणून संघात आला आहे. त्यामुळे गेल्या टी 20 वर्ल्डकप संघात पाच बदल करण्यात आले असून नव्या पाच खेळाडूंना संधी मिळाली आहे.

हेही वाचा: Shane Warne : ...म्हणून शेन वॉर्नची 'ती' ग्रीन टोपी कोटीत विकण्यात आली

रोहिच्या नेतृत्वाची वर्ल्डकप संघात आवेश खान आणि रवी बिश्नोई या दोन युवा खेळाडूंना देखील संधी मिळालेली नाही. रवी बिश्नोईच्या ऐवजी ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विन या अनुभवी फरकीपटूवर संघ व्यवस्थापनाने विश्वास दर्शवला. बिश्नोईने आशिया कपमध्ये चांगला मारा केला होता. मात्र आधीच संघात युझवेंद्र चहल असल्याने अतिरिक्त लेगस्पिनरच्या जागी ऑफ स्पिनर खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला.

दुसरीकडे आवेश खानला संघ व्यवस्थापनाने गेल्या दोन महिन्यात सातत्याने खेळण्याची संधी दिली होती. त्यामुळे ऑस्ट्रेलियातील बाऊन्सी खेळपट्ट्यांवर आवेश खानचा वापर करून घेतला जाईल असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र आशिया कपमध्ये त्याला प्रभावी मारा (विशेष करून स्लॉग ओव्हरमध्ये) करता आला नाही. त्यात दुखापतग्रस्त हर्षल पटेल फिटनेस टेस्टमध्ये पास झाल्याने संघ व्यवस्थापनाने हर्षल पटेलवर जास्त विश्वास दाखवला.

Web Title: T20 World Cup 2022 India Squad Rohit Dropped 6 Players From Previous T20 World Cup Team Lead By Virat Kohli

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..