T20WC22 Point Table : श्रीलंका किंग मेकर! 'या' सामन्यावर ठरणार इंग्लंड - ऑस्ट्रेलियाचे भवितव्य

T20 World Cup 2022 Point Table Sri Lanka Playing Key Roll In Group 1
T20 World Cup 2022 Point Table Sri Lanka Playing Key Roll In Group 1 esakal

T20 World Cup 2022 Point Table : टी 20 वर्ल्डकप 2022 मध्ये आज (दि.01) इंग्लंडने न्यूझीलंडचा 20 धावांनी पराभव केला. इंग्लंड या विजयाबरोबरच गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहचले आहे. सध्या प्रत्येकी 5 गुण घेत न्यूझीलंड अव्वल, इंग्लंड दुसऱ्या तर यजमान ऑस्ट्रेलिया तिसऱ्या स्थानावर आहे. गुणतालिकेत 4 गुण घेऊन श्रीलंका चौथ्या स्थानावर आहे. हीच श्रीलंका सध्याच्या घडीला चांगल्याच अडचणीत सापडलेल्या यजमान ऑस्ट्रेलियासाठी तारणहार ठरण्याची शक्यता आहे. जर आयर्लंडने न्यूझीलंडचा पराभव केला तर श्रीलंकेसाठी सोने पे सुहागा ठरणार आहे.

T20 World Cup 2022 Point Table Sri Lanka Playing Key Roll In Group 1
ENG vs NZ : इंग्लंड - न्यूझीलंडने मिळून यजमान ऑस्ट्रेलियाचीच गोची केली?

अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर असलेल्या न्यूझीलंड आणि इंग्लंड यांची धावगती सरस आहे. त्यामुळे जर सर्वसाधारण परिस्थितीत या समान 5 गुण असलेल्या तीनही संघांनी आपला उर्वरित प्रत्येकी 1 सामना जिंकला तरी ते पुन्हा समान 7 गुणांवर येतील. मात्र सरस धावगतीच्या जोरावर न्यूझीलंड आणि इंग्लंड सेमी फायनलसाठी पात्र होतील. हे गणित ऑस्ट्रेलियासाठी निराशाजणक आहे. मात्र त्यांच्या दृष्टीने चौथ्या स्थानावरची श्रीलंका खूप महत्वाची आहे.

श्रीलंकेनं इंग्लंडला हरवलं तर काय?

कारण जर 5 नोव्हेंबरला श्रीलंकेने इंग्लंडला हरवले तर श्रीलंका 6 गुण होतील आणि इंग्लंड +0.547 धावगती असून देखील इंग्लंडची चौथ्या स्थानी घसरण होईल. फक्त यासाठी ऑस्ट्रेलियाला अफगाणिस्तानविरूद्धचा सामना जिंकावाच लागेले. जर न्यूझीलंडने देखील आयर्लंडला पराभूत केले तर 7 गुणांसह चांगल्या धावगतीमुळे ते गुणतालिकेत अव्वल स्थानवर राहतील. ऑस्ट्रेलिया देखील 7 गुण घेऊन दुसऱ्या स्थानावर राहील आणि न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया सेमिफायनलमध्ये पोहचतील.

T20 World Cup 2022 Point Table Sri Lanka Playing Key Roll In Group 1
KL Rahul : केएल राहुलच्या भविष्याबाबत प्रशिक्षक द्रविडचे मोठे वक्तव्य

आयर्लंडने न्यूझीलंडला हरवलं तर काय?

इथे जर न्यूझीलंड आयर्लंडकडून पराभूत झाली तर सेमी फायनलचे तिकिट श्रीलंकेच्या पदरात पडू शकते. श्रीलंकेने इंग्लंडला आणि आयर्लंडने न्यूझीलंडला पराभूत केले. ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानला मात दिली तर ऑस्ट्रेलिया 7 गुणांसह अव्वल स्थानावर राहील तर श्रीलंका 6 गुण घेत दुसऱ्या स्थानावर राहील. अशा परिस्थितीत न्यूझीलंड, इंग्लंड आणि आयर्लंड हे समान 5 गुणांवर राहतील.

जर इंग्लंडने श्रीलंकेला मात दिली आणि आयर्लंडने न्यूझीलंडला मात दिली तर ऑस्ट्रेलियाचे उखळ पांढरे होणार आहे. फक्त त्यांना अफगाणिस्तानविरूद्ध विजय मिळवता आला पाहिजे. अशा परिस्थितीत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे समान 7 गुण होतील आणि न्यूझीलंड पाच गुणांवरच राहील. सरस धावगतीच्या जोरावर इंग्लंड पहिल्या आणि ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर राहतील. दोन्ही संघ सेमी फायनलसाठी पात्र होतील.

इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया तिघेही हरले तर?

अशा परिस्थितीत हे तिन्ही संघ आहे त्याच 5 गुणांवर राहतील. श्रीलंका सहा गुण घेऊन अव्वल स्थानावर पोहचेल. तर आयर्लंडचे 5 गुण होतील. अफगाणिस्तान 4 गुण घेऊन तळातच राहील. मात्र श्रीलंकेसोबत अव्वल धावगती असलेली न्यूझीलंड पात्र होईल आणि इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचा गेम होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com