T20 World Cup : जडेजा-बुमराहच्या दुखापतीवर रवी शास्त्रीची तिखट प्रतिक्रिया,"ही तर संधी..."

या दोघांची अनुपस्थिती भारतासाठी नक्कीच मोठा धक्का आहे, पण रवी शास्त्रीला फारशी चिंता नाही.
T20 World Cup Ravi Shastri
T20 World Cup Ravi Shastrisakal

T20 World Cup Ravi Shastri : टी-20 वर्ल्ड कप सुरू होण्यास आता जवळपास एक आठवडा बाकी आहे. जरी टी-20 वर्ल्ड कप 16 ऑक्टोबरपासूनच सुरू होणार आहे, परंतु 22 ऑक्टोबरपासून जेव्हा सुपर-12 चा थरार सुरू होईल. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ 23 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. विश्वचषक सुरु होण्याआधीच भारतीय संघाला दोन मोठे धक्के बसले आहेत.

T20 World Cup Ravi Shastri
Harbhajan Singh : भज्जीचा पंजाब क्रिकेट असोसिएशनवर मोठा आरोप; BCCI च्या विरोधात...

अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतींमुळे या स्पर्धेत सहभागी होणार नाहीत. रवींद्र जडेजाच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे तर जसप्रीत बुमराह पाठीच्या गंभीर समस्येने त्रस्त आहे. या दोघांची अनुपस्थिती भारतासाठी नक्कीच मोठा धक्का आहे, पण माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना त्याची फारशी चिंता नाही. वर्ल्ड कप मध्ये संघ जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांची उणीव भासेल, पण त्यामुळे नवीन चॅम्पियन शोधण्याची संधी मिळेल असा विश्वास शास्त्रीला आहे.

T20 World Cup Ravi Shastri
Harbhajan Singh : भज्जीचा पंजाब क्रिकेट असोसिएशनवर मोठा आरोप; BCCI च्या विरोधात...

बुमराहच्या जागी अद्याप कोणत्याही नवीन खेळाडूची निवड करण्यात आलेली नाही. परंतु मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी संकेत दिले आहेत की, मोहम्मद शमी पूर्ण तंदुरुस्ती झाल्यास त्याला संघात समाविष्ट केल्या जाऊ शकते. टी-20 विश्वचषकासाठी स्टँडबाय म्हणून भारतीय संघात सामील झालेल्या शमीने जुलैपासून स्पर्धात्मक क्रिकेट खेळलेले नाही. परंतु ऑस्ट्रेलियात खेळण्याचा वेगवान गोलंदाजाचा अनुभव भारतासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास शास्त्री यांनी व्यक्त केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com