
Kane Williamson : 'कॅप्टन केन' सूर्या बनायला गेला अन् बोल्ड झाला - VIDEO व्हायरल
Kane Williamson : न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जात असलेल्या T20 विश्वचषकाच्या पहिल्या उपांत्य सामन्यात शाहीन शाह आफ्रिदीने शानदार गोलंदाजी केली. T20 विश्वचषक मध्ये सुरुवातीला शाहीन त्या लयीत नव्हता पण हळूहळू त्याने आपली लय पकडली आणि आता तो आपल्या जुन्या फॉर्ममध्ये दिसत आहे. या सामन्यात शाहीनने किवी संघाचा कर्णधार केन विल्यमसनची विकेट घेतली. सूर्या बनायला गेला आणि आउट झाला.
शाहीनने न्यूझीलंडविरुद्ध दोन विकेट्स घेतल्या आणि किफायतशीर गोलंदाजी केली. त्याने चार षटकांच्या कोट्यात फक्त 24 धावा दिल्या. त्याने किवी संघाच्या प्रमुख फलंदाज फिन ऍलनला आणि नंतर विल्यमसनला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्याने पहिल्याच षटकात ऍलनला पॅव्हेलियनमध्ये पाठवले होते. 17व्या षटकात तो पुन्हा गोलंदाजीसाठी आला. त्याच्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर विल्यमसनने सूर्यकुमार यादवसारखा स्कूप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू थेट मधल्या लेग स्टंपवर जाऊन लागला.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने खराब सुरूवातीनंतर डाव सावरत 20 षटकात 4 बाद 152 धावांपर्यंत मजल मारली. न्यूझीलंडकडून डॅरेल मिचेलने झुंजार अर्धशतक केले. कर्णधार केन विलियम्सनने 46 धावांचे महत्वपूर्ण योगदान दिले. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 68 धावांची भागीदारी केली. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदीने 2 विकेट्स घेतल्या.