T20 World Cup 2026 Controversy
esakal
लोकभावनेच्या प्रवाहात जाऊन टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी आपला संघ भारतात जाऊ न देण्याची चूक करू नका. तसे केल्यास त्याचा परिणाम पुढील दहा वर्षांसाठी बांगलादेश क्रिकेटवर होईल, असा सल्ला बांगलादेशचा माजी कर्णधार तमिम इक्बालने आपल्या क्रिकेट मंडळाला दिला आहे.
मुस्तफिझूर रेहमान याला आयपीएलमधून बाहेर काढल्यानंतर त्रागा करणाऱ्या बांगालदेश क्रिकेट मंडळाने पुढील महिन्यात भारत-श्रीलंकेत होणाऱ्या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेसाठी आपला संघ भारतात न खेळवण्याची भूमिका जाहीर केली. भारतात होणारे त्यांचे साखळी सामने श्रीलंकेत हलवावे, अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात येत आहे.