

आगामी टी-२० विश्वकप स्पर्धेतून बांगलादेशला वगळण्यात आलं आहे. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. या वादात आता पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदीनेही उडी घेतली आहे. आफ्रिदीने आयसीसीवर गंभीर आरोप केले आहेत. आयसीसीची भूमिका दुटप्पी असून ते विविध देशासाठी वेगवेगळे निकष लावतात, असं तो म्हणाला. त्यामुळे क्रिकेटविश्वात आता विविध चर्चा सुरु झाल्या आहेत.