Deepak Chahar : T20 विश्वचषकापूर्वी टीम इंडियाला आणखी एक धक्का, दीपक चहर जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Deepak Chahar

Deepak Chahar : T20 विश्वचषकापूर्वी टीम इंडियाला आणखी एक धक्का, दीपक चहर जखमी

Deepak Chahar : टी-20 विश्वचषकापूर्वी भारताला आणखी एक मोठा धक्का बसू शकतो. जसप्रीत बुमराह याआधीच दुखापतीमुळे वर्ल्ड कपमधून बाहेर पडला आहे. आता पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार वेगवान गोलंदाज दीपक चहरलाही दुखापत झाली आहे. लखनौमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यापूर्वी सराव सत्रादरम्यान त्याच्या घोट्याला दुखापत झाली. अशा परिस्थितीत उर्वरित दोन वनडे खेळण्यावर सस्पेंस आहे. पहिल्या वनडेत भारताचा नऊ धावांनी पराभव झाला.

हेही वाचा: National Games 2022 : सांगलीकर राधिका आवटीने तलवारबाजीत पटकावले सुवर्ण

पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, दीपकच्या घोट्याला दुखापत झाली आहे. त्यामुळेच तो पहिल्या एकदिवसीय सामन्याला मुकला होता. त्याच्या घोट्यात क्रॅम्प आला असून त्याच्या दुखापतीची तीव्रता सध्या कळू शकलेली नाही. तो आता मालिकेतील दुसऱ्या सामन्यात खेळणार की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. भारतीय संघासाठी ही अत्यंत निराशाजनक बातमी आहे, कारण त्याचा स्टँडबाय म्हणून T20 विश्वचषक संघात समावेश करण्यात आला आहे.

हेही वाचा: Sandeep Lamichhane : अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या लामिछानेला अखेर अटक

भारतीय संघ आधीच जखमी खेळाडूंच्या समस्येने त्रस्त आहे. दुसऱ्या खेळाडूला दुखापत झाल्याची बातमी त्यांना मिळू नये अशी त्यांची इच्छा आहे. अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे टी-20 विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडला असून त्याच्या बदलीची घोषणा अद्याप झालेली नाही. बुमराहच्या जागी स्टँडबायवर असलेल्या मोहम्मद शमीचा भारतीय संघात समावेश केला जाईल, असे मानले जात आहे. दीपक चहरची लय पाहता त्याच्या नावाचाही विचार करता येणार आहे.