esakal | ब्लँक चेक देतो, फक्त भारताविरुद्ध जिंका; उद्योगपतीची पाकिस्तानला ऑफर | Sports
sakal

बोलून बातमी शोधा

ब्लँक चेक देतो, फक्त भारताविरुद्ध जिंका; उद्योगपतीची पाकिस्तानला ऑफर

ब्लँक चेक देतो, फक्त भारताविरुद्ध जिंका; उद्योगपतीची पाकिस्तानला ऑफर

sakal_logo
By
टीम ई सकाळ

इस्लामाबाद - टी २० वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी २४ ऑक्टोबरला भिडणार आहेत. यावरून आता पाकिस्तानच्या आजी माजी खेळाडूंनी भारतासह टीम विराट कोहलीवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत पाकिस्तानला एकदाही भारताविरुद्ध विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे यावेळी आम्ही जिंकू असा दावा पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंकडून कऱण्यात येत आहे. दरम्यान, यात एका पाकिस्तानी उद्योगपतीनं त्यांच्या संघाला भारताविरुद्धच्या सामन्यावरून एक ऑफर दिली आहे. पीसीबीचे नवे अध्यक्ष रमीज राजा यांनी एका मुलाखतीवेळी ही माहिती दिली.

रमीज राजा यांनी सांगितलं की,'पाकिस्तानमधील एका मोठ्या उद्योगपतीने संघाला ब्लँक चेक देऊ असं म्हटलं आहे. यासाठी संघाला फक्त एकच गोष्ट करायची आहे ती म्हणजे २४ ऑक्टोबरला भारताचा पराभव.' टी २० वर्ल्डकमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत पाच सामने खेळण्यात आले आहेत. त्या सर्व सामन्यात भारताने विजय मिळवला आहे.

हेही वाचा: पुढच्या वर्षी CSK कडून खेळेन की नाही सांगू शकत नाही- धोनी

पाकिस्तान क्रिकेट बोर्ड हे आय़सीसीकडून मिळणाऱ्या ५० टक्के निधीच्या जोरावर चालतो आणि आय़सीसीचा ९० टक्के निधी हा भारतातून येतो. यामध्ये जर भारताने आय़सीसीला निधी दिली नाही तर पीसीबीला फटका बसू शकतो. कारण पीसीबीकडून आयसीसीला काहीच मिळत नाही. त्यामुळेच पाक क्रिकेटला ताकद मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करेन असं रमीज राजा यांनी म्हटलं.

loading image
go to top