T20 World Cup: भारत हारला पण पायलटनं जिंकलं! विमानात 'मॅच' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

T20 World Cup

T20 World Cup: भारत हारला पण पायलटनं जिंकलं! विमानात 'मॅच'

T20 World Cup: सोशल मीडियावर टी 20 वर्ल्ड कपचा फिव्हर पाहायला मिळतो आहे. त्यावर व्हायरल होणारे व्हिडिओ, फोटो हे नेहमीच नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत असतात. भारतीय व्यक्ती आणि त्याचे क्रिकेट प्रेम हे सर्वश्रुत आहे. मॅच सुरु असेल आणि तो कुठे का असेना त्याला मॅचचे अपडेट्स जाणून घेण्यात कमालीचा रस असतो.

सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला आहे. तो फोटो आहे एका विमानातील. त्यात प्रवास करणाऱ्या प्रवाशानं स्कोअर जाणून घेण्यासाठी चक्क हवाई सुंदरीला विनंती केली. त्यानंतर तिनं जे केलं त्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली आहे. त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसादही मिळाला आहे. रविवारी भारत विरुद्ध आफ्रिका हा सामना होता. त्याचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी विक्रम गर्ग नावाच्या व्यक्तीनं तो फोटो शेयर केला आहे.

भारत हारला पण पायलटनं मला जिंकून घेतलं. अशी प्रतिक्रिया त्यानं तो फोटो शेयर करताना दिली आहे. त्या फोटोवर नेटकऱ्यांनी देखील भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. सध्या देशात टी 20 वर्ल्ड कपची चर्चा आहे. पाकिस्तान विरोधात भारतानं शानदार विजय मिळवल्यानंतर त्यांच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. अशातच आफ्रिकेच्या विरुद्ध झालेला सामना देखील रंगतदार झाला होता. भारताची मॅच कुणालाही चुकवावीशी वाटत नाही. मात्र गर्ग हे प्रवासात असल्यानं लाईव्ह मॅच पाहणे शक्य नव्हते.

हेही वाचा: Virat kohli hotel video: 'तुमच्या बेडरुममध्ये कोणी घुसलं तर....; अनुष्काचा संताप

विमानातून प्रवास करत असताना त्यांना स्कोअर काय झाला याची उत्सुकता होती. ते इंडिगोच्या विमानातून प्रवास करत होते. त्यावेळी त्यांनी चक्क फ्लाईच्या पायलटला स्कोअरची विचारणा केली. त्यानंतर त्यानं पायलचनं एका कागदावर त्यांना स्कोअर लिहून पाठवला होता. तो फोटो गर्ग यांनी व्हायरल केला असून तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हेही वाचा: Virat Kohli Video: 'हेच जर एखाद्या मुलीच्या बाबत घडलं असतं तर...' उर्वशी संतापली