पाकिस्तानमध्ये पराभवानंतर बळीचा बकरा शोधणे सामान्य बाब| Misbah-ul-Haq | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मिस्बाह उल हक

पाकिस्तानमध्ये पराभवानंतर बळीचा बकरा शोधणे सामान्य बाब

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणारा सामना नेहमीच चर्चेचा विषय असतो. दोन्ही देशातील चाहत्यांना कोणत्याही परिस्थितीत पराभव मंजूर नसतो. यामुळे विजयासाठी दोन्ही देश प्रयत्न करीत असतात. मात्र, आयसीसीद्वारे आयोजित होणाऱ्या सामन्यामध्ये पाकिस्तानला पाहिजे तसे यश मिळवता आला नाही. यामुळे खेळाडूंवर चाहत्यांसह माजी क्रिकेटर चांगलीच नाराजी व्यक्त करतात. अशात माजी कर्णधाराने पाकिस्तान क्रिकेटवर चांगलेच ताशेरे ओढले आहे.

टी-२० वर्ल्डकपमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना होणार आहे. या महामुकाबल्याआधी पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि माजी प्रशिक्षक मिस्बाह उल हकने पाकिस्तान क्रिकेटवर ताशेरे ओढले आहे. अपेक्षित निकाल न मिळाल्यास बळीचा बकरा बनविले जाते, असा गंभीर आरोप त्यानी केला आहे. काही दिवसांपूर्वी मिस्बाहने अचानक पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर पहिल्यांदाच त्याने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘ए-स्पोर्ट्स’ संस्थेशी संवाद साधताना तो बोलत होता.

हेही वाचा: पाय जळजळतात? जाणून घ्या यामागची कारणे

पाकिस्तान क्रिकेटमध्ये पराभवानंतर बळीचा बकरा शोधणे सामान्य बाब झाली आहे. एक सामना किंवा मालिकेत पराभव मिळाल्यानंतर एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जातात. मात्र, विकासाकडे लक्ष दिलं जात नाही. कोणत्याही मालिकेत पराभव मिळाल्यानंतर तुम्ही कोच आणि खेळाडूंना बदलू शकता, यात काहीही शंका नाही. मात्र, आतील समस्या जशीच्या तशी कायम राहील, असेही मिस्बाह म्हणाला.

वेस्ट इंडिजमधून परतल्यानंतर मिस्बाहसह गोलंदाजी प्रशिक्षक वकार युनूस यानेदेखील राजीनामा देण्याची घोषणा केली होती. पाकिस्तान क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक मिस्बाह आणि गोलंदाजी प्रशिक्षक वकार यांची नियुक्ती २०१९ मध्ये करण्यात आली होती. करारानुसार या दोघांचाही अजून एक वर्षांचा कार्यकाळ शिल्लक आहे. परंतु, दोघांनी राजीनामा दिला.

loading image
go to top