
T20 World Cup qualifier Scotland VS West Indies : ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी 20 वर्ल्डकपमध्ये सध्या पात्रता फेरीतील सामने खेळवण्यात येत आहेत. ग्रुप बी मधील स्कॉटलँड आणि वेस्ट इंडीज सामन्यादरम्यान एक दुर्घटना घडली. ही घटना मैदानावरील कॅमेऱ्यात कैद झाली आणि आता हो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
स्कॉटलँड आणि वेस्ट इंडीज यांच्यातील सामन्यादरम्यान वेस्ट इंडीज गोलंदाजी करताना एक छोटा मुलगा वरच्या स्टँडवरून खाली पडला. ही घटना मैदानावरील कॅमेऱ्यात कैद झाली. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक छोटा चिमुकला स्टँडच्या रलिंगवरून खाली पडताना दिसतोय. या चिमुकल्याचे वडील त्याला वाचवण्यासाठी पळत येतात मात्र तोपर्यंत हा मुलगा खाली पडतो. सुदैवाची गोष्ट म्हणजे मुलाला कोणताही गंभीर दुखापत झालेली नाही. हे स्टँड फार उंच नव्हते.
ही घटना घडली त्यावेळी सामन्याचा पहिला डाव सुरू होता. स्कॉटलँड बॅटिंग करत होती. 14 षटकांचा खेळ झाला होता. या सामन्यात स्कॉटलँडने दोनवेळा टी 20 वर्ल्डकप जिंकणाऱ्या वेस्ट इंडीजला 42 धावांनी पराभूत केले. वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. स्कॉटलँडने जॉर्ज मुनसेच्या नाबाद 66 धावांच्या जोरावर 160 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडीजचा संपूर्ण संघ 118 धावात तंबूत परतला.
टी 20 वर्ल्डकप 2022 स्पर्धेच्या पात्रता फेरीत हा दुसरा मोठा धक्कादायक निकाल होता. यापूर्वी नामिबियाने आशिया कप विजेत्या श्रीलंकेला पराभवाचा धक्का दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.