Parshavi Chopra: W, W, W, W... श्रीलंकेला नाचवणारी 16 वर्षाची पार्शवी चोप्रा आहे तरी कोण? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Parshavi Chopra

Parshavi Chopra: W, W, W, W... श्रीलंकेला नाचवणारी 16 वर्षाची पार्शवी चोप्रा आहे तरी कोण?

Parshavi Chopra Under 19 World Cup 2023 : दक्षिण आफ्रिकेत खेळल्या जात असलेल्या अंडर-19 महिला टी-20 विश्वचषकात भारतीय संघाने श्रीलंकेचा 7 गडी राखून धुव्वा उडवला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेचा संघ 20 षटकांत 9 गडी गमावून केवळ 59 धावांवर गारद झाला. प्रत्युत्तरात टीम इंडियाने 7.2 षटकांत तीन गडी गमावून लक्ष्य गाठले. भारतीय फलंदाजांना सोपे लक्ष्य होते पण श्रीलंकेसोबतचा खरा खेळ टीम इंडियाच्या गोलंदाजांनी केला.

हेही वाचा: IND vs NZ: 'बुमराहच्या दुखापतीमुळे BCCI सावध! वर्कलोडवर उपाय शोधत स्पर्धेची तयारी'

टीम इंडियाची नवी सेन्सेशन पार्शवी चोप्राने आश्चर्यकारक कामगिरी केली. अवघ्या 16 वर्षांच्या या भारतीय फिरकीपटूने आपल्या फिरकीची अशी जादू वापरली की श्रीलंकेच्या संघाला आपल्या तालावर नाचायला लावले. या सामन्यात पार्शवीने संघासाठी चार षटके केली. यादरम्यान फलंदाज धावा काढण्यासाठी तळमळत होते.

हेही वाचा: T20 WC IND vs SL: टीम इंडियाच्या सेमीफायनलमध्ये आशा जिवंत! लंकेला चारली पराभवाची धूळ

पार्शवीने आपल्या चार षटकांत केवळ 5 धावा दिल्या, ज्यात एक धाव वाइड होता, तर त्याच्या खात्यात एकूण 4 विकेट्सही आल्या. यामुळेच टीम इंडियाने श्रीलंकेच्या कॅम्पला केवळ 59 धावांवर रोखून विजयाचा मार्ग सुकर केला.

कोण आहे पार्शवी चोप्रा? (Who is Parshavi Chopra)

पार्शवी चोप्रा ही मूळची उत्तर प्रदेशातील बुलंदशहरची आहे. ती वयाच्या 10 व्या वर्षापासून ग्रेटर नोएडामध्ये क्रिकेटचे प्रशिक्षण घेत आहे. विश्वचषकापूर्वी पार्श्वी चोप्राचा गेल्या वर्षी न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी अंडर-19 संघात समावेश करण्यात आला होता.

पार्शवी ग्रेटर नोएडा येथील युवराज सिंग सेंटर ऑफ एक्सलन्सची विद्यार्थिनी आहे. जेव्हा पार्शवीची विश्वचषक संघात निवड झाली तेव्हा तिचा यावर अजिबात विश्वास बसत नव्हता. संघात निवड झाल्यानंतर पार्शवी म्हणाली होती की, इतक्या लहान वयात माझी अंडर-19 मध्ये भारतासाठी निवड होईल, असे मला कधीच वाटले नव्हते.

हेही वाचा: IND vs NZ: 'बुमराहच्या दुखापतीमुळे BCCI सावध! वर्कलोडवर उपाय शोधत स्पर्धेची तयारी'