IND vs NZ: 'बुमराहच्या दुखापतीमुळे BCCI सावध! वर्कलोडवर उपाय शोधत स्पर्धेची तयारी'

सराव आणि सामने यांचाही ताळमेळ ठेवण्यात येणार आहे मात्र नेटमधील सरावापेक्षा..
Mohammed Shami
Mohammed Shami

India vs New Zealand : भारतात या वर्षी होणाऱ्या मर्यादित षटकांच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेपूर्वी खेळाडूंच्या वर्कलोडवर विशेष लक्ष देण्यात येणार आहे. यात सराव आणि सामने यांचाही ताळमेळ ठेवण्यात येणार आहे. मात्र नेटमधील सरावापेक्षा प्रत्यक्ष सामन्यातून चांगली तंदुरुस्ती राखता येते, असे मत वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने व्यक्त केले.

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भन्नाट गोलंदाजी करून तीन विकेट मिळविणारा शमी सामन्यात सर्वोत्तम ठरला. जसप्रीत बुमराह अनफिट असताना शमी टीम इंडियाचा प्रमुख वेगवान गोलंदाज आहे.

Mohammed Shami
T20 WC IND vs SL: टीम इंडियाच्या सेमीफायनलमध्ये आशा जिवंत! लंकेला चारली पराभवाची धूळ

एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धा ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात होत आहे. यासाठी सर्व प्रमुख खेळाडू तंदुरुस्त राहावेत आणि उपलब्ध असावेत यासाठी राष्ट्रीय क्रिकेट अकादमी या प्रमुख खेळाडूंवर येणाऱ्या सामन्यांचा ताण याचे विश्लेषण करणार आहे. अधिक ताण येऊ नये यासाठी आयपीएल फ्रँचायझीशीचीही चर्चा करण्यात येणार असल्याचे बीसीसीआयने नुकतेच जाहीर केले आहे.

ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत दुखापतीमुळे जसप्रीत बुमराह खेळू शकला नव्हता, त्याचा फटका संघाला बसला होता. त्यामुळे बीसीसीआय आता सावध झाली आहे. खेळाडूंच्या वर्कलोडबाबत विचारले असता शमी म्हणतो, नेटमध्ये सराव करण्यापेक्षा मी सामने खेळायला अधिक पसंती देतो. द्विराष्ट्रीय सामने अधिक खेळल्यामुळे विश्वकरंडकासारख्या मोठ्या स्पर्धांसाठी चांगली तयारी करता येते.

Mohammed Shami
Sarfaraz Khan: अर्जुन किती नशीबवान! सरफराज वडिलांना म्हणतो तो तर...

रायपूरमधील सामन्यात शमीने सहा षटकांत १८ धावा देत तीन बळी मिळविले. शमीने सुरुवातीलाच न्यूझीलंड फलंदाजीचे कंबरडे मोडले. त्यामुळे त्यांना जेमतेम शतकी मजल मारता आली. १०९ धावांचे आव्हान भारताने २०.१ षटकांत पार करून एकतर्फी विजय मिळवला. सामना सुरू झाला तेव्हा खेळपट्टीवर किंचित ओलसरपणा होता; परंतु फलंदाजी करणे कठीण नव्हते. मात्र शमीसह सिराजनेही अचूक टप्प्यावर गोलंदाजी करून न्यूझीलंड फलंदाजांची नाकेबंदी केली. विशेष म्हणजे न्यूझीलंडमध्ये अशा खेळपट्टीवर खेळण्याचा अनुभव न्यूझीलंड फलंदाजांना आहे.

गोलंदाजीला साह्य होईल अशी ओलसरपणा असलेली खेळपट्टी असली तरी विकेट घेण्यासाठी अचूक दिशा आणि टप्प्यावर गोलंदाजी करावीच लागते. आम्ही सर्वांनी नियंत्रित मारा केला, असे शमीने सांगितले.

Mohammed Shami
IND vs NZ: 'न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यापेक्षा रोहित अन् विराटने रणजी क्रिकेट खेळावी...'

संघातील आता सर्वात अनुभवी गोलंदाज असल्याबाबत विचारले असता शमीने सांगितले, मी नेहमीच सहकारी गोलंदाजांशी चर्चा करत असतो. कधी कधी उत्तम गोलंदाजी केली जात असते, पण विकेट मिळत नसतात. अशा वेळी गोलंदाजाला संयम आणि निर्धार कायम राखण्याचा सल्ला देत रहाणे महत्त्वाचे असे पुढे त्यानी म्हंटले.

उम्रानला संधी मिळणार?

न्यूझीलंडविरुद्धची ही मालिका जिंकलेली असल्यामुळे आता मंगळवारी होणाऱ्या तिसऱ्या सामन्यात बदल होऊ शकतो. उम्रान मलिक आणि रजत पाटीदार यांना संधी दिली जाऊ शकते, असा अंदाज शमीने व्यक्त केला. हा निर्णय संघ व्यवस्थापनाचा असेल, असेही शमी म्हणाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com