
नुकत्याच वडोदरा येथे झालेल्या WTT युथ कंटेंडर स्पर्धेत U-15 आणि U-17 गटांमध्ये दुहेरी सुवर्णपदक जिंकणाऱ्या १४ वर्षीय दिव्यांशी भौमिकला टेबल टेनिस सुपर लीग (TTSL) महाराष्ट्र लिलावात सर्वाधिक बोली लागली.
PBG पुणे जॅग्वार्स संघाने तिला संघात दाखल करून घेण्यासाठी ८२,००० रुपयांची यशस्वी बोली लावली. दरम्यान, मुंबईतील NSCI येथे पार पडलेल्या या लिलावात ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पुरुष एकेरीचे सुवर्णपदक पटकावणारा १९ वर्षीय जश मोदी बेसायड स्पिनर्स टीटी संघात ८१,००० रुपयांमध्ये गेला.