World Team Table Tennis : भारतीयांच्या विजेतेपदाच्या आशांना सुरुंग ; जागतिक सांघिक टेबल टेनिस,पुरुष व महिला दोन्ही संघांचा पराभव

भारताच्या जागतिक सांघिक टेबल टेनिस स्पर्धेच्या जेतेपदावर मोहोर उमटवण्याच्या आशांना बुधवारी सुरुंग लागला. भारताच्या पुरुष व महिला अशा दोन्ही संघांचे आव्हान उपउपांत्यपूर्व फेरीतच संपुष्टात आले.
World Team Table Tennis
World Team Table Tennissakal

बुसान (दक्षिण कोरिया) : भारताच्या जागतिक सांघिक टेबल टेनिस स्पर्धेच्या जेतेपदावर मोहोर उमटवण्याच्या आशांना बुधवारी सुरुंग लागला. भारताच्या पुरुष व महिला अशा दोन्ही संघांचे आव्हान उपउपांत्यपूर्व फेरीतच संपुष्टात आले. भारताच्या पुरुषांच्या संघाला कोरियाकडून, तर भारताच्या महिला संघाला चीन तैपईकडून हार पत्करावी लागली.

भारतीय पुरुषांसमोर अंतिम ३२ फेरीच्या लढतीत कझाकस्तान संघाचे आव्हान होते. पहिल्या लढतीत किरिल गेरासिमेंको याने हरमीत देसाईला ३-२ पराभूत केले. शरथ कमल याने मात्र ॲलेन कुरमानगॅलियेव याच्यावर ३-२ असा रोमांचकारी विजय मिळवत भारताला १-१ अशी बरोबरी साधून दिली. जी. साथियान याने आपला अनुभव पणाला लावत एडॉस केंझीगुलोव याच्यावर ३-१ अशी मात केली. भारतीय पुरुष संघ तीन सामन्यांनंतर आघाडीवर होता. शरथ कमल याला चौथ्या लढतीत पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे कझाकस्तानला २-२ अशी बरोबरी साधता आली. अखेरच्या लढतीत हरमीत देसाईने ॲलेन कुरमानगॅलियेव याच्यावर ३-१ असा विजय संपादन करीत भारताला उपउपांत्यपूर्व फेरीत नेले.

World Team Table Tennis
Shubman Gill : वर्तमानकाळात जगणे महत्त्वाचे ; शुभमन गिल रांची सामन्याच्या दोन दिवस अगोदर पत्रकारांशी बोलताना

भारताच्या पुरुष संघासमोर उपउपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत कोरियाचे आव्हान होते. मात्र कोरियन खेळाडूंच्या झंझावातासमोर भारतीय खेळाडूंचा निभाव लागला नाही. वुजीन जॅंग याने हरमीत देसाईला ३-० असे नमवत कोरियाला १-० आघाडी मिळवून दिली.

पॅरिस ऑलिंपिकमधील प्रवेश निश्‍चित?

जागतिक सांघिक टेबल टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहचणाऱ्या देशांचा पॅरिस ऑलिंपिकमधील प्रवेश निश्‍चित आहे. मात्र त्याआधी पराभूत झालेल्या संघाचे काय होणार, असा प्रश्‍न याप्रसंगी निर्माण झाला आहे. भारतीय टेबल टेनिस संघटनेच्या सूत्रांकडून या वेळी सांगण्यात आले की, भारताचे पुरुष व महिला असे दोन्ही संघ पॅरिस ऑलिंपिकसाठी पात्र ठरणार आहेत. फक्त यासाठी पाच मार्चपर्यंत वाट बघावी लागणार आहे. दरम्यान, भारताचा पुरुष संघ जागतिक क्रमवारीत १५ व्या स्थानावर, तर महिला संघ १७ व्या स्थानावर आहे.

इटलीविरुद्ध विजय, चीन तैपईविरुद्ध पराभव

भारतीय महिला टेबल टेनिस संघ या स्पर्धेत दमदार खेळ करीत होता. त्यामुळे साहजिकच या संघाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. अंतिम ३२ फेरीच्या लढतीतही त्यांनी छान खेळ केला. भारतीय महिला संघाने इटलीला ३-० अशी धूळ चारली. श्रीजा अकुला, मनिका बत्रा व अयहिका मुखर्जी यांनी प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवत भारताला उपउपांत्यपूर्व फेरीत नेले. मात्र चीन तैपईविरुद्ध भारतीय महिला खेळाडूंना चमक दाखवता आली नाही. मनिका बत्रा हिचा अपवाद वगळता इतर खेळाडूंकडून निराशा झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com