शामसी पंतचा फोटो शेअर करत म्हणाला, कधीही मर्यादा ओलांडू नका! |Tabraiz Shamsi Tweet Rishabh Pant Photo with Caption never cross the line | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tabraiz Shamsi Tweet Rishabh Pant Photo

शामसी पंतचा फोटो शेअर करत म्हणाला, कधीही मर्यादा ओलांडू नका!

केप टाऊन : भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना आज ( दि. २३ ) केप टाऊनमध्ये खेळण्यात येणार आहे. या सामन्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू तबरेझ शामसीने (Tabraiz Shamsi) केलेले ट्विट चर्चेत आले आहे. या ट्विटमध्ये शामसीने भारताचा धडाकेबाज फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि त्याचा फोटो शेअर केला आहे. या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये तो कधीही मर्यादा ओलांडू नका असे सांगतोय.

हेही वाचा: विराटला कॅप्टन्सी सोडायला भाग पाडले; शोएबने नाक खुपसले

शामसीने पंतला बाद केल्यानंतर त्याच्या खेळीचे कौतुक करतानाचा फोटो शेअर केला. त्याला शामसीने 'कष्ट करा... त्वेषाने खेळा..... पण कधीही तुम्ही तुमची मर्यादा ओलांडू नका #Respect #SpiritOfCricket' असे कॅप्शन दिले.

भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऋषभ पंतने तबरेझ शामसीची चांगलीच धुलाई केली होती. त्याने शामसीला पाच चौकार आणि एक षटकारही मराला होता. मात्र तबरेझ शामसीनेच ऋषभ पंतची खेळी ८५ धावांवर संपवली. त्यानंतर शामसीने पंतच्या खेळीचे कौतुक केले होते.

हेही वाचा: 'राज' नाम तो सुना होगा, पठ्ठ्यानं शिखर धवनचं रेकॉर्ड मोडलं

विशेष म्हणजे भारत आणि दक्षिण आफ्रिका कसोटी (India vs South Africa Test Series) मालिकेदरम्यान, भारतीय खेळाडू आणि आफ्रिकी खेळाडू यांच्यात एक वेगळीच टशन निर्माण झाली होती. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि मार्को जेनसेन (Marco Jansen) यांच्यात तर शाब्दिक द्वंद्व देखील रंगले होते. या पार्श्वभूमीवर तबरेझ शामसीचे हे ट्विट चर्चेत आले आहे.

Web Title: Tabraiz Shamsi Tweet Rishabh Pant Photo With Caption Never Cross The Line

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top