विराटला कॅप्टन्सी सोडायला भाग पाडले; शोएबने नाक खुपसले

Shoaib Akhtar says Virat Kohli was force to leave captaincy
Shoaib Akhtar says Virat Kohli was force to leave captaincy esakal

मस्कत : भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) हे क्रिकेटच्या मैदानात फक्त वर्ल्डकप किंवा आयसीसी (ICC) स्पर्धेतच एकमेकांना भिडत असतात. मात्र पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूंना भारतीय क्रिकेट वर्तुळात घडणाऱ्या घडामोडींमध्ये फारच रस असतो. ते कायम याबाबत वक्तव्ये करत असतात. आता पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) विराट कोहलीच्या (Virat Kohli) कर्णधारपदाबाबतच्या वादावर एक वक्तव्य केले आहे.

Shoaib Akhtar says Virat Kohli was force to leave captaincy
'राज' नाम तो सुना होगा, पठ्ठ्यानं शिखर धवनचं रेकॉर्ड मोडलं

शोएब अख्तर सध्या मस्कतमध्ये लेजंड क्रिकेल लीग (Legend Cricket League) खेळत आहे. त्यावेळी त्याने एएनआयला मुलाखत दिली. त्यावेळी तो म्हणाला की, 'विराट कोहलीने कर्णधारपद स्वतःहून सोडलेले नाही तर त्याला ते सोडण्यासाठी भाग पाडण्यात आले. तो सध्या कठीण काळातून जात आहे. पण, आता विराटला स्वतःला सिद्ध करून दाखवावे लागेल. तो एक चांगला व्यक्ती आणि खेळाडू आहे. त्याने जास्त काही न करता फक्त आता क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करावे. तो एक महान फलंदाज आहे. त्याने जागतिक क्रिकेटमध्ये इतरांपेक्षा जास्तच कमावले आहे. आता फक्त त्याला आपला नैसर्गिक खेळ करायचा आहे.'

Shoaib Akhtar says Virat Kohli was force to leave captaincy
IPL 2022 प्लेअर रिटेन्शनमध्ये सर्वाधिक कंजूस कोण?

दरम्यान, आयसीसी टी २० वर्ल्डकप २०२२ चे वेळापत्रक (ICC T20 World Cup 2022 Schedule) जाहीर झाले. वर्ल्डकपची सुरुवातच भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) सामन्याने होणार आहे. २०१९ च्या वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानने भारताला पराभव केला होता. आता पुन्हा एकदा भारत पाकिस्तान एकमेकांना भिडणार आहेत. याबाबत शोएब अख्तर म्हणाला, 'आम्ही मेलबर्नमध्ये पुन्हा एकदा भारताला हरवू पाकिसानचा टी २० संघ तगडा आहे. भारतीय मीडिया भारत पाकिस्तान सामन्यावेळी त्यांच्या संघावर अनावश्यक दबाद टाकतो. भारत हरणे ही सामन्य गोष्ट आहे.'

Shoaib Akhtar says Virat Kohli was force to leave captaincy
बीसीसीआयचा IPL 2022 बाबत काय आहे बॅकअप प्लॅन?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com