esakal | तालिबान्यांचा अफगाणिस्तानच्या महिला क्रीडा स्पर्धांना विरोध
sakal

बोलून बातमी शोधा

तालिबान्यांचा अफगाणिस्तानच्या महिला क्रीडा स्पर्धांना विरोध

तालिबान्यांचा अफगाणिस्तानच्या महिला क्रीडा स्पर्धांना विरोध

sakal_logo
By
विराज भागवत

क्रीडाविश्वासह विविध स्तरातून तालिबान्यांच्या निर्णयाचा निषेध

नवी दिल्ली: अफगाणिस्तानवर (Afghanistan) तालिबानी राजवट लागू झाल्यानंतर सुमारे २० दिवसांनी कार्यकारी मंत्रिमंडळाची (acting government) स्थापना करण्यात आली. त्यानंतर टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी (T20 World Cup) अफगाणिस्तानचा संघ जाहीर करण्यात आला. पण अफगाणिस्तानच्या महिला (Women Players) खेळाडूंनी कोणत्याही प्रकारच्या क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होऊ नये असा निर्णय तालिबानी (Taliban) राजवटीने घेतला. तालिबानचे प्रवक्ते अहमदुल्ला वासिक यांनी ऑस्ट्रेलियाच्या एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की महिलांनी क्रीडा स्पर्धांमध्ये इस्लामला मान्य नाही. त्यामुळे तालिबानी राजवटीने असा निर्णय घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता चहुबाजूंनी त्यांच्या टीका केली जात आहे.

हेही वाचा: 'अफगाणिस्तानमध्ये महिलांना खेळू दिलं तरच..', क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा इशारा

नक्की काय आहे प्रकरण-

एसबीएस न्यूज नावाच्या एका ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमाशी तालिबानी प्रवक्ते अहमदुल्ला वासिक यांनी संपर्क साधून प्रतिक्रिया दिली. "इस्लाममध्ये किंवा इस्लामी संस्कृतीमध्ये महिलांना क्रिकेट किंवा कोणताही क्रीडा प्रकार खेळण्यात सक्त मनाई आहे. कारण त्या खेळांमध्ये महिलांच्या बाबतीत नको ते प्रकार घडू शकतात. कदाचित खेळताना एखाद्या क्षणी त्यांच्या चेहऱ्यावरील किंवा शरीराच्या एखाद्या भागावरील कपडा फाटून किंवा बाजूला होऊन त्यांना विचित्र प्रकाराला सामोरे जावे लागू शकते. सध्याचा काळ हा डिजिटल मीडियाचा आहे. त्यामुळे अशा प्रसंगी पटकन माध्यमे त्यांचा फोटो टिपू शकतात आणि ते फोटे इतरांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे", अशी माहिती तालिबानी प्रवक्त्यांनी दिली.

हेही वाचा: तालिबान, पाकची भूमिका आणि भारत

तालिबानच्या विचारसणीबद्दल टीकेचा सूर-

सध्या काळ खूप पुढे गेला आहे. स्त्री ही पुरूषाच्या खांद्याला खांदा लावून काम करू शकते हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. अशा वेळी अफगाणिस्तानच्या महिला वर्गाला अशाप्रकारचा त्रास देणे योग्य नाही. या विचित्र प्रकाराविरोधात संपूर्ण जगाने एकत्रितपणे आवाज उठवायला हवा.

- भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनिया

तालिबानी राजवटीचा हा निर्णय अत्यंत लज्जास्पद आहे. अफगाणिस्तान क्रिकेट गेल्या १० वर्षात खूप मेहनत करत पुढे आलं आहे. पण तालिबानी राजवट महिला खेळाडूंना केवळ क्रिकेटच नव्हे तर सर्वच खेळांपासून वंचित ठेवण्याच्या प्रयत्नात आहे. महिलांना अशा प्रकारची वागणूक देणे आणि त्यांना क्रीड स्पर्धांमध्ये सहभागी होण्यापासून रोखणे ही बाब खूपच वाईट आहे. जगभरातून याचा विरोध व्हायला हवा.

- रूपाली स्लाथिया, जम्मू-काश्मीरच्या पहिल्या महिला संघाच्या प्रशिक्षक

अफगाणिस्तानचा पुरूष संघ पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाशी कसोटी सामना खेळण्यासाठी होबार्टला येणार आहे. पण मिडीयामध्ये सांगितले जात असल्याप्रमाणे, जर अफगाणिस्तानमधील तालिबानी राजवट महिलांना क्रिकेट किंवा कोणत्याही क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होण्यापासून रोखणार असेल तर क्रिकेट ऑस्ट्रेलिया नाईलाजाने अफगाणिस्तान पुरूष संघाविरूद्ध होणारा कसोटी सामनाही रद्द करेल. कारण ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्ड स्त्री-पुरूष समानता आणि महिला क्रिकेटची वाढ या दोन्ही गोष्टींबाबत सकारात्मक आहे.

- ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्ड

loading image
go to top