US Open Badminton 2025 : तन्वी, आयुष अंतिम फेरीत;अमेरिकन ओपन बॅडमिंटन स्पर्धेमध्ये चमक
Indian Badminton Team : अमेरिकन ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या तन्वी शर्मा आणि आयुष शेट्टी यांनी अंतिम फेरीत धडक दिली आहे. तन्वीने युक्रेनच्या सातव्या मानांकित खेळाडूचा पराभव केला, तर आयुषने अव्वल मानांकित खेळाडूला नमवले.
नवी दिल्ली : तन्वी शर्मा आणि आयुष शेट्टी या भारतीय बॅडमिंटनपटूंनी अमेरिकन ओपन बॅडमिंटन स्पर्धेमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. तन्वी व आयुष या दोन्ही खेळाडूंनी अंतिम फेरीत धडक मारत जेतेपद पटकावण्याच्या दिशेने पाऊल टाकले.