esakal | पुणेकरांनो, एकदा या तरी!
sakal

बोलून बातमी शोधा

पुणेकरांनो, एकदा या तरी!

‘‘पुणेकरांनो, माझा शब्द लिहून घ्या, एकदा सामना बघायला इथे या, तुम्ही नक्कीच पुनःपुन्हा याल, ही माझी खात्री आहे,’’ असा विश्‍वास टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेचे संचालक प्रशांत सुतार यांनी व्यक्त केला.

पुणेकरांनो, एकदा या तरी!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

‘‘पुणेकरांनो, माझा शब्द लिहून घ्या, एकदा सामना बघायला इथे या, तुम्ही नक्कीच पुनःपुन्हा याल, ही माझी खात्री आहे,’’ असा विश्‍वास टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेचे संचालक प्रशांत सुतार यांनी व्यक्त केला. पुण्यासारख्या शहराला अशी आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा आयोजित करण्याची संधी मिळाली, ही खूप मोठी गोष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले.’’

या स्पर्धेत रॉजर फेडरर आणि रॅफेल नदाल आणण्याची अपेक्षा करण्यापेक्षा आपण स्थानिक हिरोंना तयार करण्याकडे लक्ष द्यायला हवे. यंदा १२ भारतीय खेळाडूंनी स्पर्धेत भाग घेतला. पुढील वर्षी आणखी खेळाडूंना संधी मिळण्यासाठी आपण प्रयत्न करू,’’ असेही ते म्हणाले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

टाटा ओपन स्पर्धेच्या पहिल्या मोसमापासून आतापर्यंत स्पर्धेत झालेल्या प्रगतीबद्दल बोलताना ‘असोसिएशन ऑफ टेनिस प्रोफेशनल्स’च्या (एटीपी) अध्यक्ष ॲलिसन ली म्हणाल्या, ‘टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेच्या पहिल्या मोसमात तयारीला खूपच कमी वेळ मिळाला. मात्र, असे असले तरी सुतारांना खूप अनुभव असल्याने त्यांनी आणि त्यांच्या टीमने खूप चांगली कामगिरी केली आणि स्पर्धा यशस्वी केली, याबद्दल मला खूप आनंद आहे. प्रत्येक वर्षी सर्वांनी टप्प्याटप्प्याने प्रगती करण्याचा प्रयत्न केला आहे आणि तेच महत्त्वाचे आहे. प्रत्येक स्पर्धेतच ‘आईसबाथ’ आणि ‘स्टिमरुम’सारख्या सुविधा मिळत नाहीत. खेळाडूंना त्याच्या तंदुरुस्तीच्या दृष्टीने या सर्व गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. इथे जेवणापासून हॉटेलपर्यंत प्रत्येक गोष्ट खेळाडूंची विचार करून केली गेली आहे. येत्या एक दोन वर्षांत स्पर्धेच्या तारखांमध्ये बदल होण्याची शक्‍यता आहे. त्याबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, ‘‘एटीपी कपमुळे या स्पर्धेच्या तारखांवर परिणाम होत आहे. २०२१ चे वेळापत्रक जाहीर झालेले आहे; मात्र, २०२२ च्या वेळापत्रकात बदल होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.’’ 

'या' कारणामुळे पुण्यात पुन्हा थंडी परतली!

या स्पर्धेतील सुतारांच्या योगदानाबद्दल त्या म्हणाल्या, ‘‘एखादा खेळाडू तयार करायचा असेल तर कोणत्या प्रकारे काम केले पाहिजे हे सुतारांना चांगले उमगले आहे. त्यांच्या अकादमीमधून ते खेळाचा प्रसार करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, अशी अनेक लोकं एकत्र आली तरच आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू तयार होतील. भारतामध्ये अशा स्पर्धांचे आयोजन झाले तर खेळाडू सातत्याने खेळत राहतील आणि त्यामुळे त्यांची क्रमवारी वाढण्यासही मदत होईल.’’