esakal | SL vs IND आतापर्यंत जे घडलं नाही ते द्रविड करुन दाखवणार
sakal

बोलून बातमी शोधा

SL vs IND

SL vs IND आतापर्यंत जे घडलं नाही ते द्रविड करुन दाखवणार

sakal_logo
By
सुशांत जाधव

India Tour Of Sri Lanka : राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख राहुल द्रविड आगामी श्रीलंका दौऱ्यावर मार्गदर्शक म्हणून टीम इंडियासोबत असणार आहेत. बीसीसीआयने श्रीलंका दौऱ्यासाठी अनुभवी शिखर धवनकडे नेतृत्वाची जबाबदारी दिली असून या दौऱ्यासाठी 20 सदस्यीय संघाची नुकतीच घोषणा केली. युवांनी बहरलेल्या संघाची घोषणा झाल्यानंतर राहुल द्रविड यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. जे आतापर्यंत कधीच झालं नाही ते या दौऱ्यात पाहायला मिळेल, याचे संकेत द्रविड यांनी दिले आहेत.

ज्यावेळी इंडिया अंडर 19 आणि इंडिया ए टीमचा कोच होतो त्यावेळी दौऱ्यावर निवडण्यात आलेल्या प्रत्येकाला खेळण्याची संधी मिळेल, हे सुनिश्चित केले होते. आमच्या काळात जी गोष्ट झाली नाही ती करण्याचा प्रयत्न केला. आता श्रीलंका दौऱ्यावरही हा प्रयोग होईल. प्रत्येकाला सामन्यात खेळण्याची संधी दिली जाईल, असे राहुल द्रविड यांनी म्हटले आहे. भारतीय संघातील युवा खेळाडूंच्या यशात राहुल द्रविड यांचा मोलाचा वाटा आहे. श्रीलंका दौऱ्यावर अनेक नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली असून त्यांच्यासाठी हा दौरा खूपच महत्त्वपूर्ण ठरेल.

हेही वाचा: SL vs IND : गब्बरच कॅप्टन, पुणेकर ऋतूराजलाही मिळाली संधी

ईएसपीएन क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार राहुल द्रविड म्हणाले की, इंडिया ए टीम किंवा अंडर 19 मध्ये सिलेक्शन झालेल्या प्रत्येक खेळाडूला दौऱ्यावर संधी मिळणार याचा विश्वास द्यायचो. यावेळी त्यांनी आपल्या काळातील किस्साही शेअर केला. इंडिया ए टीमसोबत दौऱ्यावर जाऊन मॅच खेळायला न मिळणे खूप वाईट अनुभव घेतला आहे. 700-800 धावा करुन टीममध्ये सिलेक्शन होते. पण खेळण्याची संधी मिळत नाही. त्यामुळे दौऱ्यावर प्रत्येक खेळाडूला संधी देण्याचा प्रयत्न असेल. हा प्रयोग सोपा नाही. अंडर 19 च्या स्तराव आपण एका मॅचमध्ये पाच-सहा बदल करु शकतो, असेही ते म्हणाले.

हेही वाचा: IND vs SL : राहुल द्रविड टीम इंडियाचा कोच

विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या अनुपस्थितीत भारतीय संघ श्रीलंकेचा दौरा करणार आहे. 13 जुलै ते 25 जुलै दरम्यान श्रीलंका दौऱ्यात टीम इंडिया 3 वनडे आणि 3 टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. टीम इंडियाचा एक संघ कसोटीसाठी इंग्लंडमध्ये असताना मर्यादित षटकातील सामन्यांच्या मालिकेसाठी स्वतंत्र संघ एखाद्या दौऱ्यावर जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी दोन वेगवगळ्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियात दोन गटात वेगवेगळ्या देशातील दौऱ्यावर गेला होता.

असा आहे श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ

शिखर धवन (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पदिक्कल, ऋतूराज गायकवाड, सुर्यकुमार यादव, मनिष पांड्ये, हार्दिक पांड्या, नितीश राणा, ईशान किशन (विकेट किपर), संजू सॅमसन (विकेट किपर), युजवेंद्र चहल, राहुल चाहर, कृष्णाप्पा गौतम, कृणाल पांड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, दीपक चाहर, नवदीप सैनी, चेतन साकारिया.