KL Rahul: हे 5 भिडू आहेत रांगेत त्यामुळे राहुल टाटा टाटा बाय-बाय खतम?

केएलसाठी 2022 हे वर्ष खास नव्हतं.
KL Rahul
KL Rahulesakal

सध्या सुरु असणाऱ्या भारत विरुद्ध बांगलादेश मालिकेमध्ये यजमानांविरूद्धचे दोन कसोटी सामने जिंकत भारताने 2-0 या फरकानं विजय मिळवला. अश्विन आणि श्रेयस अय्यरच्या फलंदाजीनं संघाला हा लक्षभेद करण्यास मदत केली. पण, फ्लॉप शो करणाऱ्या के.एल.राहुल मात्र खराब फॉर्ममध्ये दिसला. केएलसाठी 2022 हे वर्ष खास नव्हतं. दरम्यान, त्याची जागा घेण्यासाठी पाच खेळाडू रांगेत उभा आहेत.

केएलसाठी 2022 हे वर्ष खास नव्हतं. त्यामुळे त्याला टी20 संघातून वगळलं जाण्याची शक्यता आहे. या वर्षी त्याने एकूण 4 कसोटी सामन्यात केवळ 17.12 च्या सरासरीने 137 धावा केल्या आहेत. यामध्ये एका अर्धशतकाचा समावेश आहे. त्याचबरोबर 10 एकदिवसीय सामन्यांमध्ये 27.88 च्या सरासरीने 251 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या बॅटमधून फक्त दोन अर्धशतकं झळकली आहेत.

हेही वाचा: जोखीममुक्त व्यवहारांसाठी रिझर्व बँकेचा 'डिजिटल रुपया'

याशिवाय या वर्षी टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये त्याने 16 सामन्यांत 28.93 च्या सरासरीने 434 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 6 अर्धशतकं झळकावली आहेत. यावर्षी त्याने 30 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 25.68 च्या सरासरीने एकूण 822 धावा केल्या आहेत. त्याच्या यंदाची खराब कामगिरी पाहता त्याच्या जागी पाच खेळाडूंची नावे सध्या चर्चेत आली आहेत.

शुभमन गिल

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी कर्णधार रोहित शर्मा पूर्णपणे तंदुरुस्त झाल्यानंतर मैदानात परतण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत रोहितसोबत शुभमन गिलची सलामीची जोडी भारतीय संघासाठी प्रभावी ठरू शकते. शुभमन गिलने बांगलादेश दौऱ्यादरम्यान कसोटीत शतक केले असून तो सध्या फॉर्मात आहे. गिल आणि रोहित यांनी यापूर्वीही कसोटी क्रिकेटमध्ये सलामी दिली आहे.

KL Rahul
IND vs SL T20 Series: श्रीलंकेविरुद्ध विराटची जागा घेणार हा खेळाडू?

संजू सॅमसन

यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसनला भारतीय संघाकडून फारशा संधी मिळालेल्या नाहीत. टी 20 मध्ये सलामीवीर म्हणून केएल राहुलसाठी संजू सॅमसन हा सर्वोत्तम पर्याय असू शकतो. टी 20 आंतरराष्ट्रीयमध्ये संजू सॅमसनने चार सामन्यांत सलामी दिली आहे.ज्यामध्ये त्याने 26.25 च्या सरासरीने आणि 164.06 च्या स्ट्राइक रेटने 105 धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये मधल्या फळीत संजू हा केएल राहुलला पर्याय ठरू शकतो.

ईशान किशन

टी20 मध्ये केएल राहुलच्या जागी सलामीवीर म्हणून इशान किशन हा सर्वोत्तम पर्याय असल्याचे क्रिकेट जगतात चर्चा सुरू आहे. डावखुऱ्या फलंदाजाने 21 टी-20 सामने खेळले असून त्यात त्याने 29.45 च्या सरासरीने 589 धावा केल्या आहेत. बांगलादेश दौऱ्यावर असलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात इशान किशनने द्विशतक झळकावले. यावरून त्याच्याकडे टी-20 तसेच एकदिवसीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करण्याची क्षमता असल्याचे दिसून येते.

KL Rahul
Abdul Razzaq VIDEO : बुमराहला बेबी बॉलर म्हणणाऱ्या रझाकची त्याच्या मुलाने केली अशी अवस्था की...

ऋतुराज गायकवाड

महाराष्ट्राचा फलंदाज ऋतुराज गायकवाड देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने धावा करत आहे. नुकत्याच झालेल्या विजय हजारे करंडक स्पर्धेत ऋतुराजने चार शतके झळकावली. यूपीविरुद्धच्या सामन्यात ऋतुराजने एका षटकात सात षटकार ठोकले. ऋतुराजने मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये चांगला खेळ दाखवला. ऋतुराज गायकवाड हा T20 क्रिकेटमध्ये राहुलला ठोस पर्याय ठरू शकतो.

पृथ्वी शॉ

23 वर्षीय पृथ्वी शॉ टी-20 आणि कसोटी क्रिकेटमध्ये केएल राहुलची जागा घेऊ शकतो. शॉ याआधी भारताकडून सलामीवीर म्हणूनही खेळला आहे. शॉ सध्या फॉर्मात आहे. या मोसमातील सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये तो मुंबईसाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. भारतीय संघ व्यवस्थापनाला विशेषत: टी-२० फॉरमॅटमध्ये नवीन संघ तयार करायचा असेल, तर पृथ्वी महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com