नवी दिल्ली : टीम इंडियाचा ऑलराऊंडर क्रिकेटपटून शार्दुल ठाकूर अखेर सोमवारी विवाहबंधनात अडकला. मिताली पारुलकरसोबत त्यांनी आपली लग्नगाठ बांधली. याचे फोटो स्वतः शार्दुलनं आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. मुंबईजवळच्या कर्जतमध्ये पारंपारिक पद्धतीनं नव दाम्पत्याचा विवाहसोहळा पार पडला. विशेष म्हणजे दोघांचा लग्न सोहळा मराठमोळ्या पद्धतीनं संपन्न झाला. (Team India all rounder Shardul Thakur is finally married with Mithali Parulkar)
शार्दुल आणि मिताली एकमेकांना आधीपासूनच ओळखतात, त्यांच्यात मैत्रीनंतर प्रेम निर्माण झालं आणि आज अखेर ते लग्नबंधनात अडकले. 31 वर्षीय शार्दुलचा संगीत आणि हळदी समारंभही मोठ्या उत्साहात पार पडला होता. यामध्ये रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांनी देखील हजेरी लावली होती.
शार्दुल आणि मिताली यांनी २९ नोव्हेंबर २०२१ मध्ये मुंबईत एका खासगी कार्यक्रमात साखरपुडा केला होता. साखरपुड्याचं ठिकाणी मुंबई क्रिकेट असोसिएशनचं मनोरंजन केंद्र होतं. शार्दुलनं २०१७ मधये आंतरराष्ट्रीय सामन्यात पदार्पण केलं होतं. भारतासाठी त्यानं ८ कसोटी, ३४ वनडे आणि २५ टीट्वेंटी सामने खेळले आहेत. तसेच ९९ विकेटही त्यानं घेतल्या आहेत. तर ६२१ रन्स बनवले आहेत.
मिताली पारुलकर कोण आहे?
शार्दुलची पत्नी मिताली पारुलकर एक बिझनेस वुमन आहे. ठाण्यात ती ऑल दि बेक्स नावाचं बेकिंग बिझनेसचं स्टार्टअप चालवते. ती सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते पण तिचं इन्स्टा अकाऊंट पर्सनल आहे. म्हणजेच केवळ जवळचे लोक आणि मित्र मंडळच तिला फॉलो करतात.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.