CM शिंदे अडचणीत येणार? मविआकडून अविश्वास ठराव आणण्याच्या हालचाली

ठाकरे गटाकडून यासाठी पुढाकार घेण्यात येणार आहे.
CM Eknath Shinde News
CM Eknath Shinde NewsEsakal

मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणण्याची तयारी महाविकास आघाडीकडून सुरु करण्यात आली आहे. यासाठी ठाकरे गट पुढाकार घेणार आहे. विधानपरिषदेत मविआचं संख्याबळ अधिक आहे, त्यामुळं शिंदेंना अडचणीत आणण्याचा प्रयत्न होणार असल्याचं सूत्रांकडून कळतंय. (Will CM Shinde be in trouble motion of no confidence may by MVA)

CM Eknath Shinde News
Uddhav Thackeray: मोगँबोच्या पिढ्या जरी उतरल्या तरी...; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला घेतलेल्या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करताना त्यांचा संबंध देशद्रोह्यांशी असल्याचा उल्लेख केला होता. विरोधीपक्ष नेते अजित पवार आणि राष्ट्रवादीचे सध्या तुरुंगात असलेले नेते नवाब मलिक यांचा संबंध जोडत शिंदेंही ही जहरी टीका केली होती.

CM Eknath Shinde News
Chatrapti Sambhaji Nagar: अखेर जिल्ह्यांचही झालं नामांतर! 'छत्रपती संभाजीनगर', 'धाराशीव'चं निघालं नोटीफिकेशन

यावरुन आता महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे. त्यामुळं त्यांच्याकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अडचणीत आणण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. पण यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसऐवजी ठाकरे गट आक्रमक झाला असून तशा सूचना आमदारांना देण्यात आल्याचं कळंतय.

CM Eknath Shinde News
Raj Thakceray: एकमेव आमदारानं पक्ष ताब्यात घेतला तर? राज ठाकरेंनी दिलं उत्तर

शिवसेना फुटल्यानंतर विधानसभेत ठाकरे गटाचं संख्याबळ कमी झालंय. त्यामुळं महाविकास आघाडीकडं विधानसभेत संख्याबळ नाही पण विधानपरिषदेत आहे, त्यामुळं मुख्यमंत्र्यांविरोधात अविश्वास ठराव आणण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. पण हा ठराव दोन्ही सभागृहांमध्ये कोण मांडतंय हे पहावं लागणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com