Asia Cup: रोहितसमोर टेन्शन! टीम इंडियाला पाकच्या 'या' 5 खेळाडूंपासून धोका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

team india asia cup 2022 ind vs pak

Asia Cup: रोहितसमोर टेन्शन! टीम इंडियाला पाकच्या 'या' 5 खेळाडूंपासून धोका

Asia Cup India Vs Pakistan : भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया कपमध्ये पुन्हा एकदा जबरदस्त सामना होणार आहे. गेल्या आठवडाभरात दोन्ही संघ आमनेसामने येण्याची ही दुसरी वेळ आहे. 28 ऑगस्ट रोजी झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 5 विकेट्सने पराभव केला होता, पण त्या सामन्यानंतर दोन्ही संघात बरेच बदल झाले आहेत. भारताला पाकिस्तानशी सावधगिरी बाळगावी लागेल कारण पाकिस्तानच्या संघात असे 5 खेळाडू आहेत त्यामुळे टेन्शन वाढले.

पाकिस्तान संघाचा कर्णधार आणि सध्या जगातील नंबर वन टी-20 फलंदाज बाबर आझम हा भारतीय संघासाठी सर्वात मोठा धोका आहे. या स्पर्धेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये बाबर फ्लॉप ठरला असेल, पण हा फलंदाज कधीही पुनरागमन करू शकतो आणि टीम इंडियाला जड जाऊ शकतो.

बाबरचा सलामीचा जोडीदार मोहम्मद रिझवान हा देखील टीम इंडियासाठी मोठा धोका आहे. रिझवान जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने हाँगकाँगविरुद्ध नुकत्याच झालेल्या करा किंवा मरोच्या सामन्यात 78 धावा केल्या. टीम इंडियाला पहिल्या काही षटकांत रिजवानला बाद करून पॅव्हेलियनमध्ये परत पाठवावे लागेल.

पाकिस्तानचा नंबर 3 फलंदाज फखर जमानही टीम इंडियासाठी मोठी डोकेदुखी आहे. फखरने हाँगकाँगविरुद्ध 53 धावांची उत्कृष्ट खेळी खेळली, त्यामुळे त्याने पुनरागमनाचे संकेत दिले आहेत. फखर अगदी सहजपणे चौकार आणि षटकार मारतो.

युवा घातक वेगवान गोलंदाज नसीम शाह हा देखील भारतासाठी मोठा धोका आहे. वेदनेने हैराण असतानाही नसीमने भारताविरुद्धच्या गेल्या सामन्यात चमकदार कामगिरी केली होती. नसीम शाहने हाँगकाँगची टॉप ऑर्डरही पूर्णपणे मोडीत काढली होती. केएल राहुल आणि विराट कोहलीला नसीमपासून दूर राहावे लागेल.

पाकिस्तानचा स्टार लेगस्पिनर शादाब खानही भारतीय संघासाठी मोठा धोका आहे. शादाबने हाँगकाँगविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात 4 बळी घेतले होते. शादाबनेही भारताविरुद्ध शानदार गोलंदाजी केली. रोहित शर्मा आणि कंपनीला या गोलंदाजाचीही काळजी घ्यावी लागणार आहे.

Web Title: Team India Asia Cup 2022 Ind Vs Pak 5 Pakistan Players Who Are Tension Rohit Sharma Babar Azam Sports Cricket

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..