Team India: भुवनेश्वर कुमारचं करिअर संपणार? लवकरच टीम इंडियात 'या' गोलंदाजाची एंट्री | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Team India

Team India: भुवनेश्वर कुमारचं करिअर संपणार? लवकरच टीम इंडियात 'या' गोलंदाजाची एंट्री

Team India Bhuvneshwar Kumar : भारतीय वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारच्या कारकिर्दीची उलटी गिनती सुरू झाली आहे. भुवनेश्वर कुमार टीम इंडियाच्या बहुतांश सामन्यांमध्ये पराभवाचे कारण बनला आहे. आशिया कपपासून ते ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेपर्यंत भुवनेश्वर कुमार आपल्या फ्लॉप गोलंदाजीमुळे टीम इंडियाला पराभवाला सामोरे जावे लागत आहे.

भुवनेश्वर कुमारचा संघ भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवू शकत नाही. भुवनेश्वर कुमारच्या खराब कामगिरीमुळे टीम इंडियाचे मोठे नुकसान होत आहे. असे 2 वेगवान गोलंदाज आहेत, जे भुवनेश्वर कुमारची कारकीर्द संपुष्टात आणू शकतात आणि लवकरच टीम इंडियामध्ये धमाकेदार एंट्री करू शकतात.

भारताचा 'यॉर्कर मॅन' म्हणून ओळखले जाणारे टी नटराजन हे सध्या टीम इंडियातून बाहेर आहेत. पण लवकरच तो भारतीय संघात पुनरागमन करून शकतो. टी नटराजन श्रीलंकेचा दिग्गज लसिथ मलिंगा आणि भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह यांच्याप्रमाणेच घातक यॉर्कर चेंडू टाकतो. टी नटराजन यांनी भारतासाठी 1 कसोटी सामना 4 T20 आंतरराष्ट्रीय सामने आणि 2 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

उमरान मलिक हा सध्या भारतातील एकमेव वेगवान गोलंदाज आहे जो सातत्याने 150 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करतो. आयपीएल 2022 मध्ये उमरान मलिकने 157.71 किमी प्रतितास वेगाने चेंडू टाकला होता. उमरान मलिकने आयपीएल 2022 च्या हंगामात आपली ताकद दाखवून दिली. यादरम्यान त्याने 14 सामन्यात 22 विकेट घेतल्या. उमरान मलिक टीम इंडियात आला तर तो भुवनेश्वर कुमारचे पत्ता कट होऊ शकतो.

Web Title: Team India Bhuvneshwar Kumar India Vs Australia T20 Series 3 Fast Bowlers Sports Cricket

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..