Team India Bowling : हात जोडतो रे...! डेथ ओव्हर मध्ये तेवढा मार खाऊ नका

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाची गोलंदाजी पुन्हा एकदा अपयशी
Team India Bowling
Team India Bowlingsakal

Team India Bowling : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाची गोलंदाजी पुन्हा एकदा अपयशी ठरली आहे. दक्षिण आफ्रिकेने सामन्यात भारताचा 49 धावांनी पराभव केला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने 20 षटकांत 3 गडी गमावून 227 धावा केल्या. रिले रुसोने 48 चेंडूत नाबाद 100 धावा केल्या. भारतीय बॉलिंग युनिटने या सामन्यात पूर्णपणे गुडघे टेकले. प्रत्युत्तरात भारतीय संघ 18.3 षटकांत 178 धावांवर गारद झाला. भारताकडून दिनेश कार्तिकने सर्वाधिक 41 धावा केल्या.

Team India Bowling
VIDEO : सिराजने केली मोठी चूक, दीपक चहरने केली शिवीगाळ, 'तुला...'

दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी पाहिली तर कर्णधार टेम्बा बावुमा वगळता इतर सर्व फलंदाजांनी धावांचा पाऊस पाडला. रिले रोसोने शानदार शतक झळकावले, तर क्विंटन डी कॉकनेही धडाकेबाज अर्धशतक झळकावले. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीचा अंदाज यावरून लावता येतो की आफ्रिकन संघाने 15 षटकार ठोकले.

भारतीय संघाच्या तीन गोलंदाजांनी त्यांच्या कोट्यातील सुमारे 50 धावा लुटल्या. यामध्ये दीपक चहर, मोहम्मद सिराज आणि हर्षल पटेल यांचा समावेश आहे. यामध्ये सर्वात वाईट स्थिती दीपक चहरची होती. दीपक चहरने 4 षटकांत 48 धावा, तर मोहम्मद सिराजने 4 षटकांत 44 धावा दिल्या. हर्षल पटेल सर्वात महागडा ठरला त्याने 4 षटकांत 49 धावा दिल्या. टीम इंडियाकडून या सामन्यात एकूण 6 गोलंदाजांनी गोलंदाजी केली. केवळ उमेश यादव आणि दीपक चहर यांना 1-1 विकेट मिळाली.

Team India Bowling
IND vs SA : गोलंदाजानी बुडवली टीम इंडियाची बोट, हे आहे पराभवाची कारणे

टीम इंडियाच्या गोलंदाजांनी अखेर पाच षटकांत 78 धावा लुटल्या. यामध्ये शेवटच्या षटकात 24 धावा आल्या होत्या. ज्यामध्ये डेव्हिड मिलरने सलग 3 षटकार ठोकले. टीम इंडियाने शेवटच्या पाच षटकात 24, 11, 15, 8 आणि 15 धावा लुटल्या. त्यानंतर रोहित हात जोडतो त्याचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com