VIDEO : सिराजने केली मोठी चूक, दीपक चहरने केली शिवीगाळ, 'तुला...'

सिराजवर कर्णधार रोहित शर्मा आणि दीपक चहर चांगलेच संतापले
deepak chahar abuses mohammed siraj after david millers
deepak chahar abuses mohammed siraj after david millers

India vs South Africa : भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. टीम इंडियाने याआधीच मालिका जिंकली होती पण त्यांची नजर इंदूरमध्ये क्लीन स्वीपवर होती. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने शानदार कामगिरी दाखवली आणि भारताचा 49 धावांनी पराभव केला. तिसऱ्या सामन्यादरम्यान भारताच्या गोलंदाजीची पुन्हा एकदा पोल खोल झाली आहे. जसप्रीत बुमराहच्या दुखापतीमुळे भारताचे गोलंदाजी आक्रमण दिसत नाही. तिसऱ्या सामन्यात आफ्रिकेच्या डावातील शेवटच्या षटकात मोहम्मद सिराजने अनवधानाने मोठी चूक केली.

deepak chahar abuses mohammed siraj after david millers
IND vs SA : गोलंदाजानी बुडवली टीम इंडियाची बोट, हे आहे पराभवाची कारणे

डेविड मिलरने शेवटच्या षटकात दीपक चहरला लागोपाठ तीन चेंडूंवर तीन षटकार ठोकले. पण यादरम्यान भारताला मिलरला बाद करण्याची संधी होती, मात्र सिराजने त्याचा झेल घेतला आणि सीमारेषेवर पाऊल टाकला. डीप स्क्वेअर लेगवर उभ्या असलेल्या सिराजने डावाच्या शेवटच्या षटकातील पाचव्या चेंडूवर मिलरचा सोपा झेल घेतला. सिराजने कोणतीही चूक न करता झेल घेतला, पण तोल साधण्यासाठी त्याचा पाय सीमारेषेला लागला, यामुळे यानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि दीपक चहर चांगलेच संतापले. दीपक चहरने तर त्याला शिवीगाळ केली.

deepak chahar abuses mohammed siraj after david millers
VIDEO : दीपकलाही दिप्ती होता आलं असतं! मात्र दाखवली उदारता

सिराजच्या चुकीमुळे आफ्रिकेला त्या चेंडूवर षटकार मिळाला आणि मिलरला हे जीवदान मिळाले. त्यानंतर पुढचा चेंडू त्याने सीमारेषेच्या पलीकडे मारला. 20 व्या षटकात फलंदाजीला आलेल्या मिलरने 5 चेंडूत तीन षटकारांसह 19 धावा ठोकल्या. यासह दक्षिण आफ्रिकेला सामन्यात 227 धावा केल्या. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गेल्या दोन सामन्यात खातेही उघडू न शकलेल्या रिले रुसोने दमदार खेळी करताना तिसऱ्या सामन्यात शतक झळकावले. त्याने 48 चेंडूत 100 धावा पूर्ण केल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com