Team India Captaincy : 32 वर्षांतील ट्रेंड रोहित शर्माच्या विरोधात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Team India Captaincy

Team India Captaincy : 32 वर्षांतील ट्रेंड रोहित शर्माच्या विरोधात

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेनंतर विराट कोहली (Virat Kohli) कसोटी संघाच्या नेतृत्वाच्या जबाबदारीतून मुक्त झालाय. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने भारतीय कसोटी संघाचे (Team India) नेतृत्व सोडत असल्याची माहिती दिली. कोहलीने कर्णधारपद सोडल्यानंतर आता भारतीय कसोटी संघाचा नवा सेनापती कोण? असा प्रश्न क्रिकेट प्रेमींना पडलाय. टीम इंडियाच्या कसोटी संघाच्या कॅप्टन्सीच्या शर्यतीत सध्या दोन नावे आघाडीवर आहेत. त्यातील पहिले नाव रोहित शर्माचे (Rohit Shram) आहे तर दुसरे नाव आहे लोकेश राहुलचे. (Lokesh Rahul)

भारतीय क्रिकेटचा इतिहास (Indian Cricket) पाहिला तर 1990 पासून भारतीय संघाला 7 पूर्णवेळ कर्णधार लाभले. यातील पाच जणांचे वय कसोटी संघाचा कॅप्टन होण्यापूर्वी 30 वर्षांपेक्षा कमी होती. राहुल द्रविड आणि अनिल कुंबळे या दोघांनी तिशीनंतर भारतीय संघाच्या नेतृत्वाची धूरा सांभाळली होती.

रोहित शर्मा टेस्टमध्ये बेस्ट कॅप्टन चॉईस ठरेल का?

कसोटी संघाच्या कर्णधारपदी एखाद्या खेळाडूची निवड करताना बीसीसीआयचा फॉर्म्युला आपण लक्षात घ्यावा लागेल. दिर्घकाळासाठी संघाचे नेतृत्व करु शकेल, याला बीसीसीआय पसंती देते. त्यामुळेच ते युवा खेळाडूवर अधिक भरवसा दाखवतात. या परिस्थितीत रोहित शर्माच्या नाव बाजूला पडू शकते. रोहित शर्मा सध्याच्या घडीला 34 वर्षांचा आहे. जर बीसीसीआय भारतीय संघाला दिर्घकाळासाठी कॅप्टन मिळावा याचा विचार करत असेल तर रोहितचा पत्ता कट होऊ शकतो.

हेही वाचा: अखेर जोकोविच आउट; नदाल 'बिग थ्री'ची अब्रू राखणार?

रोहित शर्माला एका गोष्टीचा फायदा मिळू शकेल. भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने वनडे कॅप्टन्सी सोडताना म्हटले होते की स्प्लिट कॅप्टन्सी कल्चर भारतीय क्रिकेटमध्ये सूट होणार नाही. त्यानुसार तीन्ही प्रकारात रोहित कॅप्टन्सी करताना दिसू शकतो. पण बीसीसीआय निवड समिती स्प्ल्टि कॅप्टन्सीच्या फॉर्म्युल्यावर कायम राहिली तर लोकेश राहुल कर्णधार झाल्याचे पाहायला मिळू शकते. भारतीय संघाच्या आतापर्यंतचा इतिहास हा त्याच्या बाजूनं झुकणारा आहे.

हेही वाचा: तू, मी आणि एमएस...अनुष्कानं सांगितली कोहलीच्या कॅप्टन्सीची अनटोल्ड स्टोरी

मोहम्मद अझरुद्दीन- (कर्णधार झाला त्यावेळी तो 26 वर्ष, 11 महिने, 25 दिवस वयाचा होता)

सचिन तेंडुलकर- ( 23 वर्ष, पाच महिने, 16 दिवस)

सौरव गांगुली- (28 वर्ष, पाच महिने, 16 दिवस)

महेंद्रसिंह धोनी- ( 26 वर्ष, पाच महिना, 30 दिवस)

कुंबळ यांनी निवृत्ती घेतल्यानंतर धोनी कसोटी संघाचा कर्णधार झाला होता. 2008 ते 2014 या कालावधीत त्याने भारतीय संघाचे नेतृत्व केले.

विराट कोहली- (26 वर्ष, एक महिना, चार दिवस)

वरील ट्रेंड पाहता लोकेश राहुल किंवा अन्य कोणत्या नव्या शिलेदाराचा बीसीसीआय कसोटी संघाचा नवा कॅप्टन म्हणून विचार करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Web Title: Team India Captaicy Analysis Bcci 32 Years Trend In Favor In Kl Rahul Not Rohit Shrama

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top