वेस्ट इंडिजला जाण्यासाठी टीम इंडियासाठी BCCI ने मोजले तब्बल 3.5 कोटी रुपये | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 team india chartered flight england to west indies bcci cost 3 crore 50 lakh sports cricket

वेस्ट इंडिजला जाण्यासाठी टीम इंडियासाठी BCCI ने मोजले तब्बल 3.5 कोटी रुपये

West Indies vs india : टीम इंडिया सध्या वेगवेगळ्या संघांविरुद्ध मालिका खेळण्यासाठी व्यस्त झाली आहे. इंग्लंडला नुकतेच पराभूत केल्यानंतर टीम इंडिया आता शिखर धवनच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिजचा सामना करण्यासाठी सज्ज झाली आहे, या मालिकेनंतर भारतीय संघ झिम्बाब्वेविरुद्ध मालिका खेळणार आहे.

टीम इंडिया वेस्ट इंडिजविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय आणि 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळण्यासाठी वेस्ट इंडिजला पोहोचली आहे. इंग्लंडवरून टीम इंडियाला चार्टर्ड फ्लाइटने वेस्ट इंडिजला नेण्यात आले. बीसीसीआयने चार्टर्ड प्लेनसाठी तब्बल 3.5 कोटी रुपये मोजले आहे. खेळाडूंना खाजगी विमानाने मँचेस्टरहून पोर्ट ऑफ स्पेनला नेण्यात आले.

हेही वाचा: श्रीलंकेने टी-20 Asia Cupचे यजमानपद नाकारलं, भारतात होणार सामने?

टीम इंडियाला मंगळवार दुपारी 11.30 वाजता मँचेस्टर वरून पोर्ट ऑफ स्पेनसाठी निघाली, घेऊन जाणाऱ्या चार्टर्ड फ्लाइटवर बीसीसीआयने 3.5 कोटी रुपये खर्च केला. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडसह 16 खेळाडू आणि सपोर्ट स्टाफचे सदस्य होते. कॅरेबियनमध्ये गेलेल्या खेळाडूंची फॅमिली सुद्धा त्यांच्यासोबत येणार होती. बीसीसीआयला फ्लाइट वर इतकी तिकिटे बुक करणे कठीण झाले होते, अशा परिस्थितीत संघासाठी चार्टर्ड फ्लाइट बुक केले.

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज वनडे :

  • 22 जुलै, पोर्ट-ऑफ-स्पेन

  • 24 जुलै, पोर्ट-ऑफ-स्पेन

  • 27 जुलै, पोर्ट-ऑफ-स्पेन

भारतीय संघ

शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, इशान किशन, संजू सॅमसन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग.

Web Title: Team India Chartered Flight England To West Indies Bcci Cost 3 Crore 50 Lakh Sports Cricket

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..