राहुल द्रविडची राजकारणात लवकरच एन्ट्री? 'या' निवडणुकीआधी सुरू करणार नवी इनिंग I Rahul Dravid | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul Dravid

गेल्या काही दिवसांपासून अनेक दिग्गज खेळाडू राजकारणात एन्ट्री करताना दिसत आहेत.

द्रविडची राजकारणात लवकरच एन्ट्री? 'या' निवडणुकीआधी सुरू करणार नवी इनिंग

गेल्या काही दिवसांपासून अनेक दिग्गज खेळाडू राजकारणात एन्ट्री करताना दिसत आहेत. त्यातच आता बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीपाठोपाठ (Sourav Ganguly) टीम इंडियाचा हेड कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झालीय. भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे संमेलन हिमाचल प्रदेशच्या (Himachal Pradesh) धर्मशालामध्ये 13 ते 15 मे या कालाधीमध्ये होणार आहे. या शिबिराला राहुल द्रविड उपस्थित राहणार आहे.

दरम्यान, पुढील वर्षी होणाऱ्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीची (Karnataka Assembly Election 2023) तयारी भाजपानं सुरू केलीय. द्रविडची भाजपाच्या शिबिराला उपस्थिती ही याच तयारीचा भाग मानली जात आहे, त्यामुळं राजकीय चर्चांना उधाण आलंय. राहुल द्रविडसह कुस्तीपटू बबिता फोगट देखील या शिबिराला उपस्थित राहणार असल्याचं कळतंय.

हेही वाचा: ऑस्ट्रेलिया वर्ल्डकपपूर्वी T20 मालिकेसाठी भारतात येणार... पाहा वेळापत्रक

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda), हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्यासह पक्षाचे अनेक प्रमुख नेते या शिबिराला उपस्थित राहणार आहेत. संपूर्ण देशभरातून 139 प्रतिनिधी या शिबिरामध्ये उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.

Web Title: Team India Coach Rahul Dravid To Attend Bjps Mega Event In Poll Bound Himachal Pradesh Report

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top