ऑस्ट्रेलिया वर्ल्डकपपूर्वी T20 मालिकेसाठी भारतात येणार... पाहा वेळापत्रक | India Play Home Series Against Australia | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

India Play Home Series Against Australia

ऑस्ट्रेलिया वर्ल्डकपपूर्वी T20 मालिकेसाठी भारतात येणार... पाहा वेळापत्रक

IND vs AUS: ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ या वर्षी होणार्‍या T-20 विश्वचषक 2022 पूर्वी भारतात T20 मालिकासाठी येणार आहे. ऑस्ट्रेलिया ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये झिम्बाब्वे आणि न्यूझीलंड यांच्यात एकदिवसीय मालिका खेळणार आहे. यानंतर सप्टेंबरमध्ये तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी भारतात येणार आहे. सामन्यांच्या तारखा नंतर जाहीर केल्या जाणार आहे. ऑस्ट्रेलिया संघ या मालिकेतून टी-20 विश्वचषक 2022 ची पूर्व तयारी पूर्ण करेल. या वर्षी 16 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर दरम्यान ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषक होणार आहे.(India Play Home Series Against Australia)

हेही वाचा: गांगुलीची पत्नी होणार भाजप खासदार? अमित शाह यांच्या डिनरनंतर चर्चांना जोर

टी-20 मालिका खेळल्यानंतर ऑस्ट्रेलियान संघ 2023 मध्ये चार सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. हे कसोटी सामने फेब्रुवारी आणि मार्चमध्ये खेळवले जातील. ही कसोटी मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) अंतर्गत खेळवली जाणार आहे. ऑस्ट्रेलियाने शेवटचा 2017 मध्ये भारताचा कसोटी दौरा केला होता, तेव्हा त्यांना कसोटी मालिकेत पराभवाला सामोरे जावे लागले होते.

हेही वाचा: KKR च्या मॅनेजमेंटची सिलेक्शन मध्ये लुडबुड; श्रेयस अय्यर संतापला

आयपीएल 2022 संपल्यानंतर भारताला 5 सामन्यांच्या T20 मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकला जाणार आहे. ही मालिका 9 ते 19 जून दरम्यान खेळवली जाणार आहे. त्यानंतर टीम इंडिया दोन सामन्यांच्या T20I मालिकेसाठी आयर्लंडला जाणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ T20 मधून थेट कसोटी खेळायला जाईल, जिथे ते इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा कसोटी सामना खेळतील. मागच्या वर्षीच हा सामना खेळवला जाणार होता, पण १ जुलै रोजी भारतीय कॅम्पमध्ये कोरोनाचे प्रकरण समोर आल्यानंतर तो पुढे ढकलण्यात आला होता.

Web Title: T20 3 Match India Play Home Series Against Australia In September

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top