esakal | रवी शास्त्री कोविड पॉझिटिव्ह; इतर दोन कोचसह चौघे आयसोलेशनमध्ये!
sakal

बोलून बातमी शोधा

Ravi-Shastri

रवी शास्त्री कोविड पॉझिटिव्ह; इतर दोन कोचसह चौघे आयसोलेशनमध्ये!

sakal_logo
By
विराज भागवत

BCCI ने केलं ट्वीट, वाचा कोणाचा आहे समावेश

Ind vs Eng 4th Test: भारतीय संघ सध्या इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. या कसोटी मालिकेसाठी भारताचा मोठा चमू आणि सपोर्ट स्टाफ इंग्लंड दौऱ्यावर दीर्घकाळापासून आहे. या मालिकेतील चौथ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारताने वर्चस्व राखले. पण त्यानंतर एक धक्कादायक माहिती समोर आली. भारतीय संघाचे तीन कोच आणि एक सपोर्ट स्टाफ सध्या आयसोलेशनमध्ये असल्याची माहिती मिळाली. भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आला. त्यानंतर, बॉलिंग कोच भरत अरूण, फिल्डिंग कोच आर श्रीधर आणि फिजीओ नितीन पटेल यांना चौघांना खबरदारीचा उपाय म्हणून आयसोलेशनमध्ये ठेवले आहे. BCCIने स्वत: ट्वीट करून याबद्दल माहिती दिली.

टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह शनिवारी रात्री पॉझिटिव्ह आला. त्यानंतर BCCI च्या वैद्यकिय टीमने त्यांच्या संपर्कात असणाऱ्या गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरूण, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर आणि फिजिओ नितीन पटेल यांनाही विलगीकरणात ठेवले. या सर्वांची RT-PCR चाचणी करण्यात आली आहे. या चौघांच्या चाचणीचे रिपोर्ट जोपर्यंत निगेटिव्ह येत नाहीत तोपर्यंत त्यांना हॉटेलमध्येच राहावं लागणार आहे. टीम इंडियासोबत पुढच्या दौऱ्यावर त्यांना सध्या तरी परवानगी देण्यात आलेली नाही.

हेही वाचा: Video: विराट-जाडेजाचा 'मास्टरप्लॅन'; फिल्डिंग बदलली अन्...

इतर सर्व सदस्यांचीही काल रात्री आणि आज सकाळी अशा दोन कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी ज्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला त्यांना चौथ्या दिवसाच्या खेळासाठी जाण्यास परवानगी देण्यात आली.

loading image
go to top