esakal | Video: विराट-जाडेजाचा 'मास्टरप्लॅन'; फिल्डिंग बदलली अन्...
sakal

बोलून बातमी शोधा

Virat-Jadeja-Master-Plan

Video: विराट-जाडेजाचा 'मास्टरप्लॅन'; फिल्डिंग बदलली अन्...

sakal_logo
By
विराज भागवत

इंग्लंडची एक जोडी मैदानात फटकेबाजी करतो होती, त्यावेळी...

Ind vs Eng 4th Test: भारताचा पहिला डाव १९१ धावांवर आटोपला. भारतानंतर इंग्लंडच्या डावाचीही सुरूवात खराबच झाली. रॉरी बर्न्स (५), हसीब हमीद (०), जो रूट (२१), डेव्हिड मलान (३१) आणि क्रेग ओव्हरटन (१) झटपट बाद झाले. पण ओली पोपने आधी जॉनी बेअरस्टोसोबत आणि मग मोईल अलीसोबत भागीदारी करत संघाला चांगली आघाडी मिळवून दिली. मोईन अली चांगल्या लयीत असताना जाडेजा आणि विराट यांनी एक प्लॅन करून त्याला माघारी धाडला. तो व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल झाला आहे.

हेही वाचा: Video: रोहितने हवेत उडी मारून टिपलेला भन्नाट झेल एकदा पाहाच

मोईन अलीसोबत ओली पोप दमदार खेळ करत होता. मोईन अली 7 चौकारांसह ३७ धावांवर खेळत होता. त्याला रोखणं भारतासाठी गरजेचं होतं. त्यावेळी जाडेजा आणि विराट कोहली यांच्यात मैदानावरच चर्चा रंगली. त्यानंतर त्या दोघांनी प्लॅनिंग केलं आणि फिल्डिंग मध्ये काही बदल केले. त्यानंतर अगदी पुढच्याच चेंडूवर मोईन अली मोठा फटका खेळायला गेला आणि झेलबाद होऊन माघारी परतला.

त्यानंतर ओली पोपने ८१ धावांची खेळी केली. त्याला ख्रिस वोक्सने चांगली साथ दिली. त्यानेही ५० धावांची खेळी केली. अखेर २९० धावांवर इंग्लंडचा संघ बाद झाला आणि त्यांनी पहिल्या डावाअंती ९९ धावांची आघाडी घेतली.

loading image
go to top