
मुंबई: भारतीय संघाला पहिल्या टी२० सामन्यात इंग्लंडविरोधात पराभव पत्करावा लागला. भारताने प्रथम फलंदाजी करताना केवळ १२४ धावांपर्यंतच मजल मारली. आघाडीच्या फलंदाजांच्या हाराकिरीचा संघाला मोठा फटका बसला. केवळ मुंबईकर श्रेयस अय्यरने अर्धशतक ठोकल्याने संघ कसाबसा शंभरीपार पोहोचला. पण इंग्लंडच्या संघाने मात्र १६व्या षटकातच १२५ धावांचे आव्हान पार केले. बरेच दिवसांनी संघात स्थान मिळालेले भुवनेश्वर कुमार आणि हार्दिक पांड्या या दोघांच्या गोलंदाजीला धार दिसून आली नाही. भारताला या सामन्यात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची उणीव भासली. बुमराह सध्या लग्न करणार असल्याने सुटीवर गेला असल्याच्या बातम्या विविध प्रसारमाध्यमांतून मिळत आहेत. स्पोर्ट्स अँकर संजना गणेशन ही त्याची गर्लफ्रेंड असून तिच्याशी तो लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे, अशीही चर्चा आहे. अशा परिस्थितीत बुमराह आणि संजना यांचा एक जुना व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे.
२०१८-१९च्या वर्षात भारतीय क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरीच्या करणाऱ्यांचा जानेवारी २०२० मध्ये बीसीसीआयच्या पुरस्कार सोहळ्यात सन्मान करण्यात आला. या सोहळ्यामध्ये भारतीय क्रिकेटमधील बडे खेळाडू, माजी खेळाडू, मंडळाचे वरिष्ठ अधिकारी सारेच उपस्थित होते. या सोहळ्यात जसप्रीत बुमराहची मुलाखत त्याची गर्लफ्रेंड संजना गणेशन हिने घेतली होती. व्हिडीओ गेम (मोशन गेमिंग) स्वरूपातील एका क्रिकेटच्या खेळासंबंधी तिने बुमराहची मुलाखत घेतली होती. व्हिडीओमध्ये जसप्रीत बुमराह गोलंदाजी करत होता. तर मोशन गेमिंगच्या स्वरूपात तो हातात बॅट घेऊन त्याच्याच गोलंदाजीवर फलंदाजीही करताना दिसला. या खेळाचं नावंच बुमराह विरूद्ध बुमराह असं ठेवण्यात आलं होते. या खेळासंदर्भात संजनाने बुमराहची मुलाखत घेतल्याचा व्हिडीओ सध्या नव्याने व्हायरल झाला आहे.
पाहा व्हिडीओ-
IPL मध्ये क्रिकेट प्रेझेंटर आणि अँकरच्या भूमिकेत असलेल्या संजना गणेशनचं नाव बुमराहशी जोडले जात आहे. स्टार स्पोर्ट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) यांच्या शोमध्ये ती झळकली आहे. संजना पुण्यातील सिम्बॉयसिस कॉलेजची विद्यार्थिनी आहे. संजना आणि जसप्रीत बुमराह दोघांच्या अफेयरची चर्चा सध्या रंगू लागली आहे. पण या दोघांनी आपल्या नात्याबद्दल अद्याप काहीही सांगितलेले नाही. मिळालेल्या माहितीनुसार बुमराह आणि संजना १४-१५ मार्चला गोव्यात विवाहबंधनात अडकणार आहेत. हे लग्न साधेपणाने पार पडणार असून लग्नासाठी निमंत्रण मिळालेल्या पाहुण्यांना सोबत मोबाईल न बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या लग्नासाठी दोघांचे जवळचे नातेवाईक आणि अगदी मोजकेच पाहुणेमंडळी उपस्थित राहणार आहेत, अशीही माहिती आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.