SA vs IND, 3rd Test: 30 वर्षे, 7 कर्णधार... पण पुन्हा आफ्रिकेत मात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

SA VS IND

SA vs IND, 3rd Test: 30 वर्षे, 7 कर्णधार... पण पुन्हा आफ्रिकेत मात

IND vs SA, 3rd Test: भारतीय संघाचे दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकण्याचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले असून, केपटाऊन कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी भारताचा 7 विकेट्सनी पराभव झाला आहे. भारताला विजयासाठी दक्षिण आफ्रिकेसमोर 211 धावांचे लक्ष्य मिळाले होते, मात्र टीम इंडियाने आफ्रिकन भूमीवर ही मालिका 1-2 ने गमावली. (India Loss Test Series In Africa)

भारतीय संघ आठव्यांदा (Indian Team South Africa Tour) कसोटी मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेत गेला होता, पण एकदाही त्यांना कसोटी मालिका (Test Series) जिंकता आलेली नाही. यादरम्यान सात भारतीय (Seven Indian Captains Played In South Africa ) कर्णधारांनी संघाची सूत्रे हाती घेतली होती. तर, 2010-11 च्या दौऱ्यात भारताची सर्वोत्तम कामगिरी झाली होती. त्यानंतर धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वाखाली भारतीय संघाने मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवली.

हेही वाचा: या पाच कारणामुळं टीम इंडियाचं मालिका जिंकण्याचं स्वप्न अधूरंच

आतापर्यंतच्या भारताच्या दौऱ्यांवर एक नजर (Team India South Africa Tour)

1992-93 मध्ये भारतीय संघ मोहम्मद अझरुद्दीनच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेला होता. त्या दौऱ्यातील चार सामन्यांच्या मालिकेत भारताला 0-1 असा पराभव स्वीकारावा लागला होता. डरबन, जोहान्सबर्ग आणि केपटाऊन येथे झालेले कसोटी सामने अनिर्णित राहिले. त्याचवेळी पोर्ट एलिझाबेथ कसोटी सामन्यात भारताला नऊ गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता.

त्यानंतर 1936-97 मध्ये सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत गेला होता. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताला 0-2 असा पराभव स्वीकारावा लागला होता. डरबन आणि केपटाऊन कसोटी सामन्यात भारताला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्याचवेळी जोहान्सबर्ग कसोटी सामना अनिर्णित राहिला होता.

भारताने 2001-02 मध्ये सौरव गांगुलीच्या (Sourav Ganguly) नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला होता. त्यादरम्यान भारताला दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 0-1 असा पराभव स्वीकारावा लागला होता. तर, ब्लूमफॉन्टेन येथे झालेल्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नऊ गडी राखून विजय मिळवला होता. त्याचवेळी पोर्ट एलिझाबेथ कसोटी सामना अनिर्णित राहिला होता.

यानंतर टीम इंडिया 2006-07 मध्ये राहुल द्रविडच्या (Rahul Dravid) नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेली होती. जोहान्सबर्ग कसोटी सामन्यात भारतीय संघाने यजमान संघाचा 123 धावांनी पराभव करत शानदार सुरुवात केली होती. दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर भारतीय संघाचा हा पहिला कसोटी विजय ठरला. मात्र, डर्बन आणि केपटाऊनमधील उर्वरित दोन सामने गमावून भारतीय संघाने मालिका 1-2 ने गमावली होती.

हेही वाचा: Video: मंगळुरू पोलिसांनी फिल्मी स्टाईलने आवळल्या चोराचा मुसक्या

2010-11 मध्ये भारतीय संघ एमएस धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेला होता. भारताने शानदार कामगिरी करत तीन सामन्यांची कसोटी मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडवली. सेंच्युरियन कसोटीतील दारूण पराभवानंतर भारताने डर्बनमधील दुसरा सामना 87 धावांनी जिंकला होता. त्याचबरोबर केपटाऊनमध्ये झालेला तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना अनिर्णित ठेवला होता.

2013-14 मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारत पुन्हा एकदा आफ्रिकेमध्ये पोहोचला. यावेळी धोनी ब्रिगेडला 0-1 असा पराभव स्वीकारावा लागला होता. जोहान्सबर्ग येथे खेळवण्यात आलेला पहिला कसोटी सामना अनिर्णित ठरला. यानंतर डर्बन कसोटी सामन्यात भारताला दहा विकेट्सने दारूण पराभवाला सामोरे जावे लागले होते.

2017-18 मध्ये भारताने विराट कोहलीच्या (Virat Kohali ) नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला, परंतु कसोटी मालिकेचा निकाल संघाच्या बाजूने लागला नाही. केपटाऊन आणि सेंच्युरियनमध्ये झालेल्या सामन्यांमध्ये विराट ब्रिगेडला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्याचवेळी भारताने जोहान्सबर्ग कसोटी सामना 63 धावांनी जिंकून मालिका 1-2 ने गमावली तरी स्वाभिमान वाचवला होता.

यावेळी भारतीय संघ कोहलीच्या नेतृत्वाखाली मोठ्या आशेने दक्षिण आफ्रिकेला गेला होता. सेंच्युरियन कसोटी सामन्यात भारताने 113 धावांनी दणदणीत विजय नोंदवत शानदार सुरुवात केली. मात्र जोहान्सबर्ग आणि केपटाऊन कसोटी सामन्यातील पराभवाने टीम इंडियाचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले आहे.

हेही वाचा: चारचाकी वाहनचालकांसाठी महत्त्वाचे; नितीन गडकरींचा मोठा निर्णय

भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा (कसोटी मालिका आणि कर्णधार)

  • 1992/93: 0-1 पराभव, मोहम्मद अझरुद्दीन (कर्णधार)

  • 1996/97: 0-2 पराभव, सचिन तेंडुलकर (कर्णधार)

  • 2001/02: 0-1 पराभव, सौरव गांगुली (कर्णधार)

  • 2006/07: राहुल द्रविड (कर्णधार) कडून 1-2 पराभव

  • 2010/11: 1-1 अनिर्णित, एमएस धोनी (कर्णधार)

  • 2013/14: 0-1 पराभव, एमएस धोनी (कर्णधार)

  • 2017/18: 1-2 पराभव, विराट कोहली (कर्णधार)

  • 2021/22: 1-2 पराभव, केएल राहुल आणि विराट कोहली (कर्णधार)

Web Title: Team India Loss Hope Win Series In South Africa See Record 7 Captains In 30 Years

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top