esakal | रोहित आणि विराटमध्ये फरक काय? शुबमन गिल म्हणतो...
sakal

बोलून बातमी शोधा

Virat-Rohit-Gill

सलामीवीर शुबमनने रोहित आणि विराटसोबत अनेकदा फलंदाजी केली आहे.

रोहित आणि विराटमध्ये फरक काय? शुबमन गिल म्हणतो...

sakal_logo
By
विराज भागवत

नवी दिल्ली: भारतीय संघातील (Team India) दोन स्टार फलंदाज म्हणजे विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma). विराटने टीम इंडियाचे नेतृत्व करताना आपली कॅप्टनशीप (Captainship) दाखवून दिली आहे, तर रोहित शर्माने मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाला सर्वाधिक वेळा IPL विजेतेपद मिळवून देत नेतृत्वकौशल्य सिद्ध केलंय. पण तरीही रोहित आणि विराट यांच्यात काही महत्त्वाचे फरक (Difference) आहेत असं प्रत्येकालाच वाटतं. हा फरक भारताचा युवा सलामीवीर शुबमन गिल (Shubman Gill) याने स्पष्ट केला. (Team India Opener Shubman Gill Explains Difference between Virat Kohli Rohit Sharma)

हेही वाचा: न्यूझीलंडच्या दिग्गजाकडून आक्रमक विराटचं कौतुक

"मी जेव्हा विराटशी चर्चा करत असतो तेव्हा तो मला सांगतो की तू मैदानावर निर्भिडपणे खेळ. मैदानात असताना मानसिकता खूप महत्त्वाची असते असं त्याचं स्पष्ट मत आहे. फलंदाजीसाठी जाताना आपलं मन अतिशय शांत आणि केंद्रीत असायला हवं असं त्याचं मत असतं. त्याने त्याचे मानसिक बलाबद्दलचे काही अनुभव माझ्याशी शेअरदेखील केले आहेत. पण रोहित शर्मासोबत जेव्हा मी बोलत असतो, तेव्हा एक गोष्ट जाणवते की तो कायम गोलंदाजीवर फटकेबाजी करण्याबद्दल बोलतो. गोलंदाज चेंडू कुठे टाकेल? आपल्या मैदानात कसा खेळ करणं अपेक्षित आहे? खेळाचा वेग कधी वाढवायचा? हे सारे विषय आमच्या चर्चेत असतात", अशा शब्दात त्याने विराट आणि रोहितमधील मूळ फरक सांगितला.

हेही वाचा: सुशील कुमारला दणका! रेल्वेच्या सेवेतून निलंबित

कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलसाठी त्याला संघात स्थान देण्यात आलेले आहे. त्याबाबतही त्याने आपलं मत व्यक्त केलं. "WTC Final इंग्लंडच्या जमिनीवर खेळण्यात येणार आहे. इंग्लंडमध्ये जेव्हा ढगाळ वातावरण असतं तेव्हा चेंडू जास्त स्विंग होतो आणि खेळणं अवघड होतं. पण जेव्हा लख्ख सूर्यप्रकाश असतो तेव्हा मात्र फलंदाजांसाठी ते नंदनवन ठरतं. त्यामुळे तेथे खेळताना वातावरणाचा अंदाज घेणं खूप गरजेचं आहे", असं गिल म्हणाला.